28 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरविशेषपॅलेस्टाईनमधील लोकांच्या मदतीसाठी भारताचे विमान रवाना!

पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मदतीसाठी भारताचे विमान रवाना!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादानंतर भारताकडून सहाय्य

Google News Follow

Related

हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरूच आहे.गाझा पट्टीतील संघर्षग्रस्त पॅलेस्टिनींना भारताकडून वैद्यकीय साहित्य व आपत्ती निवारण साहित्य पाठवण्यात आले आहे.पॅलेस्टाईनला जवळपास ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन भारताचे विमान रवाना झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.हे विमान इजिप्तमार्गे पॅलेस्टाईन देशात पोहचणार आहे.विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधला होता त्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर भारताकडून मदत पाठवण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली.बागची म्हणाले, “पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन एक IAF C-१७ विमान इजिप्तमधील अल-अरिश विमानतळाकडे रवाना झाले आहे.”इजिप्त आणि गाझा दरम्यानच्या रफाह बॉर्डर क्रॉसिंगद्वारे या वस्तू पॅलेस्टाईनला पाठवल्या जाणार असल्याचे त्यानी लिहिले आहे. बागची यांनी सांगितले की , पाठवण्यात आलेल्या साहित्यामध्ये “जीवन रक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे”.

हे ही वाचा.. 

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी तीन दिवसा अगोदर संपर्क साधला होता.त्यानंतर लगेच भारताकडून मदतीचे विमान पाठवण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अब्बास यांच्याशी संवाद साधताना म्हणाले होते की, भारत पॅलेस्टिनींना मानवतावादी मदत पाठवत राहील. गाझा पट्टीतील एका इस्पितळात झालेल्या हल्ल्यात नागरिकांच्या जीवितहानीबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला होता.तसेच प्रदेशामध्ये वाढता दहशतवाद,हिंसाचार आणि ढासळत चाललेल्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली.

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरु झाले.या युद्धात दोन्ही बाजूंकडून आतापर्यंत ५,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत.गाझा हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याने जागतिक नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा