32 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषकॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

मशिदीच्या भेटीला आलेले असताना आला अनुभव

Google News Follow

Related

टोरोंटो येथील एका मशिदीच्या भेटीवर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची स्थानिक नागरिकांनी हुर्यो उडवली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी हमास आणि इस्रायलदरम्यान युद्धबंदीचे आवाहन करावे, अशी मागणी या आंदोलकांनी केली. ट्रुडो हे ‘इंटरनॅशनल मुस्लिम्स ऑर्गनायझेशन ऑफ टोरोंटो’मध्ये सहभागी होण्यासाठी टोरोंटोत आले होते.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे टोरोंटो येथील एका मशिदीला भेट देण्यासाठी आले होते. या पार्श्वभूमीवर मशिदीभोवती जमलेल्या लोकांनी त्यांची हुर्यो उडवली.

तसेच, कॅनडाच्या पंतप्रधानांना पोडिअमपर्यंत जाऊ न देण्याची विनंती आयोजकांकडे केली. मशिदीबाहेर पडल्यानंतर त्यांनी इस्रायल आणि हमासविरोधात युद्धबंदीचे आवाहन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. एका महिलेने त्यांना ‘किती पॅलेस्टिनी लहान मुलांचा जीव गेल्यानंतर तुम्ही युद्धबंदीचे आवाहन कराल?,’ असे उद्विग्नतेने विचारले.
नुकतेच कॅनडातील ३३ खासदारांनी पंतप्रधान ट्रुडो यांना पत्र पाठवून त्वरित युद्धबंदीचे आवाहन करा, अशी मागणी केली आहे. तसेच, गाझा पट्टीमध्ये मानवातावादी मदत पाठवण्यासाठी मार्ग खुला करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

मॅनहोल साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाखांची भरपाई द्या!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

ट्रुडो यांनी सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात कोणाचीही बाजू घेतलेली नाही. त्यांनी याबाबत मुत्सद्दी भूमिका घेतली आहे. त्यांनी हमासचा निषेध केला असून इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, अशा शब्दांत इस्रायलला पाठिंबा दिला आहे. तसेच, इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात शांतता नांदावी, यासाठी कॅनडा द्विराष्ट्र तोडग्याला समर्थन देते, असेही त्यांनी सांगितले. तसेच, हमास ही संघटना पॅलेस्टिनी नागरिक किंवा मुस्लिम अथवा अरब समुदायाचे प्रतिनिधीत्व करत नाहीत, असेही त्यांनी निक्षून सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
111,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा