27 C
Mumbai
Friday, January 28, 2022
घरविशेषम्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा

म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा

Related

वसईमध्ये पीपीपी तत्वावर आधारीत सुरक्षा स्मार्ट सिटी हा दोन हजार घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. म्हाडाच्या सहाय्याने एक खासगी बिल्डर हा प्रकल्प उभारत आहे. अर्ज मागविण्यासाठी अनेक ठिकाणी जाहिरातीही देण्यात आल्या आहेत. मात्र या लॉटरीचा अर्ज भरताना एक अजबच प्रश्न विचारण्यात आला आहे. घर खरेदी करणाऱ्या अर्जदारांना मांसाहारी की शाकाहारी हा प्रश्न विचारण्यात आला आहे.

वसई येथे पीपीपी तत्वावर एक मोठा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये दोन हजार घरे उभारण्यात येत आहेत. या सर्व घरांसाठी लॉटरी काढण्यात आली असून त्यांची किंमत २० लाख इतकी आहे. ही घरे ज्यांना घ्यायची आहेत त्यांना एक अर्ज भरावा लागणार आहे. मात्र, या अर्जात तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी हा प्रश्न डायट या रकान्यात विचारण्यात आला आहे. तसेच या प्रश्नाचे उत्तर देणे अनिवार्य आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या म्हाडाला मांसाहार चालत नाही की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

हे ही वाचा:

कोजागिरी पौर्णिमेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

धर्मांतरविरोधी कायदा करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

कौतुकास्पद! लसीकरण १ अब्जच्या दिशेने

अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’

‘या प्रश्नाविषयी समजताच त्वरित सुरक्षा स्मार्ट सिटी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून हा प्रश्न काढून टाकण्यास सांगितले आहे. मांसाहारी की शाकाहारी हा प्रश्नच येत नाही आणि म्हाडामध्ये हे चालणार नाही,’ असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वीच असेच एक प्रकरण समोर आले होते. मीरारोडमध्ये मराठी नागरिकांना घरे नाकारली जात होती. केवळ गुजराती, मारवाडी, जैन या लोकांनाच घर विकायचे असून मराठी नागरिकांना परवानगी नाही, असे सांगितले जात होते. संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,597अनुयायीअनुकरण करा
5,850सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा