अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बांगलादेशी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आता नव्या माहितीकडे सर्वांचे लक्ष आहे. याच दरम्यान, आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात रोहिंग्याचा हात असेल तर गृहमंत्रालयाला प्रश्न विचारले पाहिजेत असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावरून भाजपा मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आरोपी बांगलादेशी असलाचे समोर येताच आदित्य ठाकरे म्हणाले, ही गंभीर बाब असून यात रोहिंग्यांचा सहभाग आढळला तर ते केंद्र सरकारचे अपयश आहे. गेल्या १० वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे आणि जर बांगलादेशी लोक भारतात येत असतील तर ती त्यांची जबाबदारी आहे. अशी घुसखोरी होत असेल तर केंद्र सरकारच्या भूमिकेवर आणि जबाबदारीवर प्रश्न निर्माण होतो. केंद्र सरकारचे अपयश आहे कि नाही हे स्पष्ट झाले पाहिजे. अशा घटना घडत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे.
हे ही वाचा :
ब्रिटीश लेबर खासदार हिंदूंऐवजी जमात-ए-इस्लामीला भेटले
वाँटेड जिहादी जहीर अलीला आसाममध्ये पकडले
हॉटेल ट्रायडंटच्या खोलीत आढळला महिलेचा मृतदेह
४०० पायऱ्या चढून शिवमंदिरात पोहोचली उर्फी जावेद, महादेवाचे घेतले दर्शन!
यावर आशिष शेलार यांनी ट्वीटकरत उबाठावर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात चमत्कार, भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार. बांग्लादेशी घुसखोर बांद्रयापर्यंत आले म्हणून उबाठाचे “छोटे आणि मोठे” आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नावाने बोटं मोडत आहेत? वरुन आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण विसरत नाही ? सभेत दाखवण्यापुरते हातात रुद्राक्षांच्या माळा घालून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील भोंदू, मतलबी, स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना आमचा थेट सवाल आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, भाजपाची सत्ता असलेल्या आसाम, त्रिपुरा मधून घुसखोरी होत नाही. मग घुसखोरी कुठून होते? उबाठाच्या प्रिय दिदी ममता दीदींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगाल मधून बांग्लादेशीयांची घुसखोरी सुरु आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात करण्यास दिदींचा विरोध आहे. उबाठा मग तुमच्या प्रिय दिदींना का विचारत नाही घुसखोरी बद्दल? घुसखोर वांद्रे पश्चिम पर्यंत आलेत वांद्रे पुर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही म्हणून राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
महाराष्ट्रात ! चमत्कार !!
भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार !!◆बांग्लादेशी घुसखोर
बांद्रयापर्यंत आले म्हणून उबाठाचे "छोटे आणि मोठे" आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नावाने बोटं मोडत आहेत…?◆वरुन आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 20, 2025







