टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नव्या फॅशन लुकबद्दल तर दररोज चर्चेत असते. याच दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो समोर आला आहे. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
उर्फी जावेदने ४०० पायऱ्या चढून शिवमंदिर गाठले आहे. त्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्फी जावेद शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. यावेळी ती भारतीय लूकमध्ये अतिशय साधी आणि क्यूट दिसत होती. तिने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शिव शंकराचे दर्शन घेतले. नववर्षानिमित्त अभिनेत्रीची हा लुक लोकांना पसंत पडत आहे.
मंदिरात प्रवेश करत दोन्ही हात जोडून महादेवाचे दर्शन घेताना ती फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या शिव मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मी ४०० पायऱ्या चढल्या आहेत.’ दरम्यान, अभिनेत्रीची शिवभक्ती पाहून अनेक यूजर्स खूश आहेत. एका युजरने लिहिले कि उर्फी एक चांगली व्यक्ती आहे. दुसऱ्या युजरने उर्फिला महाकुंभात जाण्याचा सल्ला दिला.
हे ही वाचा :
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचे एन्काऊंटर फेक? पाच पोलिसांवर ठपका!
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा
‘व्होट जिहाद पार्ट २’: छ.संभाजी नगरात बांगलादेशी-रोहिंग्यांकडून १० हजारहून अधिक अर्ज!
महाकुंभ : ८ व्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांची मेळ्याला भेट!