28 C
Mumbai
Tuesday, August 3, 2021
घरविशेषचाकरमान्यांनु गावाक चला! मोदी सरकारकडून गणेशोत्सवासाठी ७२ विशेष गाड्या

चाकरमान्यांनु गावाक चला! मोदी सरकारकडून गणेशोत्सवासाठी ७२ विशेष गाड्या

Related

गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी ७२ स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तशी घोषणा नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

गणेश उत्सवासाठी मुंबईतून आपापल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष ७२ गाड्या चालवणार आहोत. गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड डेली स्पेशल या गाडीच्या एकूण ३६ ट्रिप होतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या १० ट्रिप होणार आहेत. पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या गाडीच्या १६ ट्रीप होतील आणि पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या गाडीच्या एकूण १० ट्रीप होणार आहेत, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत

‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख

वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले

आपण प्रत्येकाने कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळलेच पाहीजे. ७२ गाड्या सोडूनही जर प्रतीक्षा यादी असेल, प्रवासाची अडचण होत असेल तर रेल्वे मंत्रालयाने अधिक गाड्या सोडण्याचे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिले आहेत. मात्र कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,309अनुयायीअनुकरण करा
2,160सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा