28 C
Mumbai
Monday, August 2, 2021
घरराजकारणभाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी आ.राम सातपुते यांची नियुक्ती

भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी आ.राम सातपुते यांची नियुक्ती

Related

भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कर्नाटकचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. बुधवार, १४ जुलै रोजी ही घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

बुधवारी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सहमतीने भाजपाच्या युवक आघाडीची अर्थात भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत सात राष्ट्रीय उपाध्यक्ष, तीन राष्ट्रीय महामंत्री, तर सात राष्ट्रीय सचिव यांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी, मीडिया प्रभारी, सोशल मीडिया प्रभारी, तसेच पॉलिसी रिसर्च, या पदांवर प्रत्येकी एका व्यक्तीची नियुक्ती केली गेली आहे.

हे ही वाचा:

जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर

केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

महाराष्ट्राचे माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना या कार्यकारणीत राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या आधी सातपुते यांच्यावर युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. विद्यार्थी चळवळीतून सातपुते यांचा उदय झाला असून युवकांच्या प्रश्नावर ते कायमच आक्रमकपणे आवाज उठवत असतात. आमदार राम सातपुते यांच्या व्यतिरिक्त मधुकेश्वर देसाई यांची देखील महाराष्ट्रातून राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

या कार्यकारिणीत सातपुते यांच्या व्यतिरिक्त आणखीन एका आमदारांना आणि एका खासदारांना संधी दिली गेली आहे. पश्चिम बंगालचे खासदार राजू बिष्टा यांना राष्ट्रीय महामंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालचेच आमदार अनुप कुमार सहा यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नेमले गेले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,306अनुयायीअनुकरण करा
2,140सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा