27 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषमोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'ची घेतली माहिती

मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती

लष्करप्रमुखांशी केली भेट

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ऑपरेशन सिंदूर’वर लक्ष ठेवून आहेत. शनिवारी याच संदर्भात त्यांनी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं नेतृत्व केलं. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह, थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी सहभागी झाले होते.

ही बैठक अशा वेळी झाली आहे जेव्हा भारताने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पूर्णपणे अपयशी ठरवले आहेत. असा अंदाज आहे की या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींना पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांची, भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तर कारवाईची आणि लष्करी तयारीची संपूर्ण माहिती देण्यात आली.

हेही वाचा..

पोखरणमध्ये स्फोटांचे आवाज

ऑपरेशन सिंदूर : पाकिस्तानमधील टॉप-५ दहशतवाद्यांचा खात्मा

भारताच्या प्रत्युत्तर हल्ल्यांनी पाक बिथरला! परराष्ट्र मंत्री म्हणतात, तणाव कमी व्हावा

योग आणि प्राणायाम आहे फरक

पंतप्रधान सतत प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या २४ तासांत पंतप्रधान मोदींची लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत ही दुसरी महत्त्वपूर्ण बैठक आहे. यापूर्वी शुक्रवारी देखील त्यांनी अशाच प्रकारच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवले होते. त्याआधी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुज हे एअरबेस प्रभावित झाले आहेत. याशिवाय पाकिस्तानने क्षेपणास्त्रांचा वापर करत दवाखाने आणि शाळा यांना लक्ष्य केलं. विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सिरसा आणि सूरतगढ एअर फोर्स स्टेशनच्या शनिवारी सकाळच्या छायाचित्रांचा हवाला देत ही ठिकाणे सुरक्षित असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, “पाकिस्तानी लष्कर पश्चिम सरहद्दींवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यांनी भारतीय लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याचे शस्त्र, लढाऊ शस्त्रे आणि फायटर जेटचा वापर केला आहे. भारताने अनेक धोके निष्फळ केले, पण पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न केला. पंजाबमधील एअर फोर्स बेसला लक्ष्य करत त्यांनी रात्री १:४० वाजता हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. त्यांनी आरोग्य सेवा केंद्रे आणि शाळांवर देखील हल्ले केले.”

असेही सांगण्यात आले की, “पाकिस्तानच्या या कारवायांनंतर भारताने तात्काळ प्रत्युत्तर दिलं. रफीकी, मुरीद, चकलाला, रहिमयार खान येथील पाक लष्करी ठिकाणांवर अचूक शस्त्रास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला. सियालकोटचा एअरबेस देखील लक्ष्य करण्यात आला.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा