ओडिशाच्या मुखमंत्री पदासाठी मोहन चरण माझी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.तसेच दोन उपमुख्यत्र्यांची निवड देखील करण्यात आली आहे.केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.मुख्यमंत्री निवडीसाठी दोन्ही केंद्रीय मंत्री ओडिशात पोहोचले होते.मुखमंत्री निवडीसाठी आमदारांची बैठक झाल्यानंतर या बैठकीत ओडिशाच्या मुखमंत्री पदासाठी मोहन चरण माझी यांच्या नावाला मंजुरी मिळाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.याशिवाय दोन उपमुख्यमंत्री म्हणून केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा यांच्या नावाची घोषणा केली.
हे ही वाचा:
मलावीच्या उपराष्ट्रपतींचा विमान अपघातात मृत्यू!
“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”
निवडणुकीत ठाकरेंनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीला!
लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!
दरम्यान, १२ जूनला ओडिशाच्या नव्या भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे.यामध्ये पंतप्रधान मोदींसह अनेक जेष्ठ नेते सहभागी होणार आहेत.५३ वर्षीय मोहन माझी हे आदिवासी समाजातील आहेत.ते राज्यातील पहिल्या भाजप सरकारचे नेतृत्व करणार आहेत. केओंधार विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.