28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषअबब! म्हाडाच्या ८९८४ घरांसाठी अडीच लाख अर्ज

अबब! म्हाडाच्या ८९८४ घरांसाठी अडीच लाख अर्ज

Google News Follow

Related

म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गतच्या ८९८४ घरांसाठी अर्ज नोंदणीकरता भरघोस प्रतिसाद लाभला आहे. अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. म्हाडाने याआधीच नोंदणी आणि अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. येत्या १४ ऑक्टोबर रोजी या लॉटरीची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या ८९८४ घरांसाठी आतापर्यंत एकुण २ लाख ५१ हजार ४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २ लाख ८ हजार ९३० अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

बॅंकेत अनामत रक्कम भरण्यासाठी १ आक्टोबर रात्री १२ पर्यंत भरता येणार आहे. कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत सदनिकांच्या विक्री यंदाच्या लॉटरीत उपलब्ध आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याअनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) १५ सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

हे ही वाचा:

गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड ईडीसमोर जाणार?

दिलासादायक!!! देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटतेय!

…आणि अमरिंदर सिंगचा झाला ‘फुटबॉल’, काय घडले असे विचित्र?

‘खासगी रुग्णालयांनी केली कोरोना रुग्णांची सर्वाधिक लूट’

मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे ३६ सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिका, सर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा