25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरविशेष२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण

२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण

Related

देशात सध्या कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट पाहायला मिळत असून भारतात गेल्या चोवीस तासात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील पॉझिटिव्हिटी रेट वाढत असून दुसरीकडे ओमायक्रोन बाधितांची संख्याही वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.

देशात गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ६८ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात १४ लाख १७ हजार ८२० कोरोना रुग्ण असून पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर गेला आहे. दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट ११ टक्क्यांवर होता. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी पॉझिटिव्हीटी रेट हा १४.७८ टक्क्यांवर होता. त्यात वाढ होऊन तो १६.६६ वर गेला आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

केंद्र म्हणते महाराष्ट्रात पुरेसा लससाठा आहे

टीम इंडियाला साडेसाती; तिसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्सनी जिंकली

देशात ५ हजार ७५३ जणांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची म्हणजेच ओमायक्रोनची लागण झाली आहे. शनिवारच्या आकडेवारीनुसार देशात ६ हजार ४१ ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून ही चिंतेची बाब आहे. मृत्यूंचा आकडा ही वाढल्याची नोंद आहे. देशात चोवीस तासात ४०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशभरात ४ लाख ८५ हजार ४७२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या लोकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात १५६ कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा