26 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरविशेषरात्रंदिन आम्हा दुग्धाचा प्रसंग ! मदर डेअरीने केली भाववाढ

रात्रंदिन आम्हा दुग्धाचा प्रसंग ! मदर डेअरीने केली भाववाढ

एक लिटर फुल क्रीम दूध ६४ रुपये

Google News Follow

Related

मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात लिटरमागे एक रुपयांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर टोकनयुक्त दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी ऑक्‍टोबर महिन्यात मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. आता एक लिटर फुल क्रीम दूध ६४ रुपये झाले आहे. त्याचबरोबर आता टोन्ड दूध ५० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार सोमवारपासून नवीन किमती लागू होतील. दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले. नवीन दर लागू झाल्यानंतर आता टोन्ड दूध ५० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. मदरडेअरी दररोज ३ दशलक्ष लिटरपेक्षा जास्त दूध पॅकेटमध्ये आणि व्हेंडिंग मशीनद्वारे विकते.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

याआधी १५ ऑक्टोबर रोजी, मदर डेअरीने वाढत्या उत्पादन खर्चाचा हवाला देत दिल्ली-एनसीआरमध्ये फुल क्रीम दूध आणि गायीच्या दुधाच्या किमती २ रुपयांनी वाढवल्या होत्या . त्याच दिवशी अमूलने गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये फुल क्रीम आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली. याआधी ऑगस्टमध्‍ये या प्रसिध्‍द दुधाच्‍या ब्रँडने दुधाच्‍या दरात २ रुपयांनी वाढ केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा