27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरविशेषमध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणाऱ्या मोहम्मद हाजीच्या घराची केली 'दगडमाती'

मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणाऱ्या मोहम्मद हाजीच्या घराची केली ‘दगडमाती’

मुख्यमंत्री मोहन यादव सरकारची कारवाई

Google News Follow

Related

मध्यप्रदेशातील छतरपूरमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्यांवर मुख्यमंत्री मोहन यादव सरकारने कडक कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यावर दगड फेक केल्याप्रकरणी ४५ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले असून २०० हुन अधिक अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाचा प्रमुख मोहम्मद हाजी अली हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मोहम्मद हाजी अलीवर कारवाई करत सरकारने त्याच्या आलिशान बंगल्यावर बुलडोजर चालवून बंगला जमीनदोस्त केला आहे. बंगल्यातील दोन महागड्या गाड्यांवर देखील बुलडोजर चालवण्यात आले आहे.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश आरोपी शहरातून पळून गेले आहेत. मुख्य आरोपी मोहम्मद हाजी अली हा देखील अद्याप फरार असून अटकेसाठी त्याचा शोध सुरु आहे. पोलीस स्थानिक गुप्तचरांचीही मदत घेत आहेत. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी डिजिपी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यात सांगितले आहे. मध्य प्रदेश हे ‘शांततेचे राज्य’ आहे, कोणीही नियोजनबद्ध पद्धतीने कायदा हातात घेतला तर खपवून घेणार नसल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृती होऊ नये यासाठी दोषींची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे मुख्यंमत्री यादव यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काय आहे पोलंडमधील कोल्हापूर मेमोरियल?

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित

दिल्ली पोलिसांना मोठे यश; ‘अल कायदा प्रेरित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश’

महाराष्ट्राचे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी (२१ ऑगस्ट) छतरपूरमधील मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिम समाजाने परिसरात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत छतरपूरमधील पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या घटनेत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह तीन पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांवर उपचार सूर आहेत. महंत रामगिरी महाराजांविरुद्ध तक्रार दाखल करण्यास हा मुस्लिम समाज पोलीस ठाण्यात एकवटला होता. दरम्यान, यावेळी मोठी घोषणाबाजी झाली आणि संतप्त जमावाने दगडफेक केली. या प्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद हाजी अलीवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा