27 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरविशेषमुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा खेळ

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा खेळ

टोल कंपन्या महामार्गावरील दुरुस्तीवर दुर्लक्ष करून, मुंबई-अहमदाबाद महामार्ग निष्पाप लोकांचे बळी घेत आहे.

Related

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा नुकताच कार अपघातात मृत्यू झाला. याच मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसेदिवस अपघातांची संख्या वाढून मृत्यू होण्याच्ये प्रमाण वाढले आहेत. या अपघातात मालवाहतूक वाहनामध्ये मर्यादे पेक्षा जास्त सामान भरणे, अवैध रीत्या वाहन ओव्हरटेक करणे, सर्व्हिस रोडचा अभाव, अतिवेग व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होताना दिसत आहे. यामुळेच मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

महामार्गावर चारोटी ते खानिवढे या दरम्यान ५० किमी अंतरावर दोन टोलनाके आहेत. मात्र वसुली करण्यात व्यस्त असलेल्या टोल नाके पावसामुळे महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडले असल्यांमुळे, अपघातात काही नागरिकांना जीव गमवावा लागतो. मुंबई-महामार्गावरील चारोटी, मेंढवण, आंबोली, नांदगाव, एशियन पंप या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येते. तसेच चारोटी येथे चुकीच्या पद्धतीने उड्डाणपुलाला उतार दिल्यामुळे वळणात येणाऱ्या वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत.

हे ही वाचा:

हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?

५० फुटवरून झुला खाली आदळला आणि

आशिया कप सुपर फोरमध्ये पाकिस्तानने केली भारताला परतफेड

राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये

एशियन पंपाजवळ पेट्रोल व गॅस भरण्यासाठी जाणाऱ्या वाहनामध्ये सतत अपघात घडत असतात, मेंढवन खिंडीजवळ तीव्र उतारामध्ये बऱ्याचवेळा वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होतो. तसेच रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने अंधारात वाहन एका मार्गावरून, दुसऱ्या मार्गावर जाऊन आदळतात, त्यामुळे रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आंबोलीजवळ गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिक नागरिक उड्डाण पुलाची मागणी करत आहेत. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिक निष्पाप लोकांचे रास्ता पार करताना बळी जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा