26 C
Mumbai
Thursday, July 18, 2024
घरविशेषप्रेमजाळ्यात अडकवून एका हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

प्रेमजाळ्यात अडकवून एका हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

आमीरवर पॉक्सो व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल

Google News Follow

Related

हिंदू अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणात अडकवून तिचा दोनदा विनयभंग केल्याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी सोमवारी अमीर चौधरी सय्यद चौधरी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. मुंबईतील मीरा रोड भागातील जेपी नॉर्थ सोसायटीत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नवघर पोलिस ठाण्यात या १८ वर्षांच्या आरोपीवर भारतीय दंड संहिता, १८६०च्या कलम ३५४ आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला तिच्या निवासी मित्रासोबत फोटो शूटसाठी सोसायटीत गेली होती. आरोपीने मुलीला पाहिल्यानंतर त्याने तिच्याकडे ‘मैत्री’चा हात पुढे केला. दोघांनी त्यांचे इंस्टाग्राम आयडी एक्सचेंज केले आणि ते संपर्कात राहू लागले. आरोपी हा मुलीला फोन करायचा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्याशी चॅटही करायचा. तो तिला भेटण्यासाठी वारंवार फोन करत असे. या वर्षी मार्चमध्ये, आरोपीने मुलीला मॅक्स प्रो जिमजवळ भेटण्यासाठी बोलावले, जेथे त्याने जबरदस्तीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्या इच्छेशिवाय तिला जवळ घेतले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला दूर ढकलले आणि ती घरी पळून गेली.

नुकतेच २४ जून रोजी आरोपीने पुन्हा मुलीला सेव्हन स्क्वेअरजवळील बागेत भेटण्यासाठी बोलावले. त्याने पुन्हा मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने मदतीसाठी तिच्या आईला बोलावले. त्यानंतर दोघींनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मीरा रोड आणि भाईंदर परिसर अलीकडच्या काळात सर्व चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. फेब्रुवारी २०२४मध्ये, येथे अशी १५ प्रकरणे नोंदवली गेली. ज्यात इस्लामवाद्यांनी हिंदू महिलांचा छळ केला, नंतर विनयभंग केला, बलात्कार केला आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले.

हे ही वाचा:

केनियात करवाढीला विरोध करताना संसद भवनावर हल्ल्याचा प्रयत्न!

कॉलेजमध्ये हिजाब हवा म्हणणाऱ्या मुलींची याचिका फेटाळली

तामिळनाडू विषारी दारू प्रकरण; मृतांची संख्या पोहचली ५६ वर!

ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक देशहिताची विधेयके झाली संमत!

मुंबईतील मिरा रोड भागात मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्येचे वर्चस्व आहे आणि जो समाज अल्पसंख्याक आणि अत्याचारित असल्याचा दावा करतो तो इतर समाजातील रहिवाशांसाठी समस्या बनत आहे, असा दावा सकल हिंदू समाजाच्या सदस्यांनी केला आहे. या प्रदेशातील बदलत्या लोकसंख्येचे स्पष्टीकरण देताना सकल हिंदू समाजाचे किशोर संत (सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदलले आहे) म्हणाले होते, “पूर्वी या मिरा भाईंदर प्रदेश, नयानगर भागात हिंदू लोकसंख्येचे वर्चस्व होते. गेल्या काही वर्षांत, मुंब्रा भागातील किंवा अगदी वेगवेगळ्या शहरांतून अनेक मुस्लिमांनी या भागात स्थलांतर केले.

नंतर नयानगर आणि मीरा रोड भागात हे लोक जाणूनबुजून हिंदूंना त्रास देऊ लागले. त्यांनी त्यांच्या मुलींना त्रास देण्यास सुरुवात केली, त्यांना त्यांच्या व्यवसायात अडथळा आणला आणि या लोकांनी हिंदूंकडून खंडणीची मागणी केल्याची अनेक प्रकरणे आहेत. याचा परिणाम म्हणून, अनेक हिंदू मुंबई आणि ठाण्यात इतर प्रदेशात स्थलांतर करू लागले.

आणखी एक हिंदू कार्यकर्ते प्रताप देवकाते (सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदलले आहे) यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम अजूनही हिंदूबहुल परिसर असलेल्या भाईंदर परिसरातील हिंदू व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देतात. “‘नो-हॉकर्स’ झोन असलेल्या भागात फेरीवाले बसवतात आणि अप्रत्यक्षपणे ग्राहकांना हिंदू दुकानांमध्ये जाण्यापासून रोखतात. मग ते हळूहळू हिंदू दुकानदारांच्या मुलींना अडकवायला सुरुवात करतात ज्यामुळे लव्ह जिहादच्या घटना घडतात,” असे त्याने सांगितले. लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी करताना, पोलिसांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मतही देवकाते यांनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
165,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा