28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषरेल्वे रुळावर ठेवला होता खडी भरलेला पिंप पण...

रेल्वे रुळावर ठेवला होता खडी भरलेला पिंप पण…

मोटरमनने दाखविले प्रसंगावधान

Google News Follow

Related

मुंबई आणि उपनगरात गणेशाेत्सवाची धूम सुरू असतानाच मध्य रेल्वेवर घातपाताचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. लाेकलच्या माेटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा संभाव्य माेठा अपघात टळल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास साेडला आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सॅंडहर्स्ट राेड ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर खडी भरलेला २० किलाेचा लाेखंडी पिंप आला. या पिंपावर धावती लाेकल धडकली असती तर माेठा अपघात घडला असता. परंतु माेटरमन अशाेक शर्मा यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला आहे.

खाेपाेलीवरून मुंबईच्या दिशेने ही जलद लाेकल येत हाेती. गाडीने सॅंडहर्स्ट राेड स्टेशन साेडल्यावर त्याचवेळी माेटरमन शर्मा यांच्या निदर्शनास हा पिंप आला. त्यानंतर त्यांनी तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावला. अचानक ब्रेक लागल्याने लाेकलमधील प्रवासीही घाबरले. ब्रेक लागल्यानंतर अवाज हाेत गाडी थांबली.

हे ही वाचा:

केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

 

या प्रकरणी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस या सर्व घटनेमागील व्यक्तीचा शाेध घेत आहेत.या घटनेमागे दहशतवादी कृत्य आहे का याची चाचपणीही पाेलिस करत आहेत. परंतु सध्या तरी पाेलिसांना याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण पाेलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

गणेशाेत्सवामध्ये गणेशभक्त माेठ्या प्रमाणावर मुंबईतले सार्वजनिक गणेशाेत्सव बघण्यासाठी बाहेर पडतात. त्यातून दादर पासून ते मुंबई सीएसटीपर्यंत अनेक सार्वजनिक गणेशाेत्सव असल्याने ते बघण्यासाठी गणेशभक्तांची माेठी गर्दी या दहा दिवसात बघायला मिळते. हा पिंप नेमका या रेल्वे रुळांवर कधी ठेवण्यात आला हे स्पष्ट हाेऊ शकलेलं नाही. परंतु दरराेज लाखाे प्रवासी लाेकलने प्रवास करत असल्यामुळे पाेलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे जाेरदार प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेवरील सीसीटीव्ही फूटेजचीही मदत तपासासाठी घेण्यात येत आहे. माेटरमन शर्मा यांच्यामुळे आपला जीव वाचला अशीच भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा