33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरविशेषमुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर!

मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर!

आगामी अर्थसंकल्पात १४.१९ टक्के वाढ

Google News Follow

Related

देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (४ फेब्रुवारी) सादर करण्यात आला. ७४,४२७. ४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना हा अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महानगर पालिकेच्या या अर्थसंकल्पात १४.१९ टक्के वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या या अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे जाळे, फुटपाथ  यांच्यासाठी ५ हजार १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकरासांठी अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी ७ हजार कोटींची तरतूद , तर शिक्षण सुविधांसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

६०.६५ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई करांवर कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ आणि शुल्क वाढ लादलेली नाही. चालू अर्थ संकल्प हा ५९ हजार ९०० कोटींचा मांडण्यात आला होता. त्यामध्ये सुधार करून तो ६५ हजार १८० कोटींवर नेण्यात आला. तर आगामी अर्थसंकल्प ७४,४२७. ४१ कोटी इतका आहे.

हे ही वाचा : 

धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना विभागात ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप

खिचडी घोटाळा प्रकरणातील आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांना जामीन मंजूर

पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभाला देणार भेट, संगमात करणार स्नान!

मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे… 

  • मुंबईतील रस्त्यांचे जाळे ; फुटपाथ यांकरता ५१०० कोटींची तरतुद
  • कोस्टल रोड करता १५०७ कोटींची तरतुद
  • कोस्टल रोड -२ या पश्चिम उपनगराला जोडणा-या दहिसर ते भाईंदर या किनारी रस्त्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४३०० कोटींची तरतुद
  • गोरेगांव मुलुंड लिंक रोडकरता १९५८ कोटींची तरतूद
  • कचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडून कर लागु केला जाणार, तूर्तास कर नाही यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार.
  • बेस्ट उपक्रमासाठी १००० कोटींची तरतूद अनुदान म्हणून देण्यात येणार.
  • आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी ७००० कोटींची तरतूद
  • शिक्षण सुविधांसाठी ४००० कोटींची तरतूद.
  • मुंबईतल्या महापालिका शाळांची स्थिती सुधारण्याकरता दोन महत्वाच्या मोहिमा. मिशन २७ आणि मिशन संपूर्ण हे दोन मिशन पालिकेच्य़ा शाळांकरता राबवले जाणार
  • मुंबईसाठी विशेष वातावरणीय बजेट सादर, पर्यावरण खात्याकरता ११३ कोटींची तरतुद.
  • मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण १३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची अर्थसंकल्पात माहिती. महानगर पालिका उर्वरित काँक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये हाती घेणार. यामधील टप्पा एक मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा दोन मधील ५० टक्के कामे जून २०२५ पूर्वी पूर्ण करण्याची काम प्रस्तावित आहे, यामुळे पावसाळ्यातील खड्डे पडण्याचे समस्येचे प्रमाण कमी होईल असा महानगरपालिकेचा दावा आहे.
  • शहरातील  झोपडपट्टीतील गाळेधारकांसाठी नवा कर लागू करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील २० टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार. या माध्यमातून साधारण ३५० कोटी इतका महसूल अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा