29.4 C
Mumbai
Friday, June 26, 2026
घरविशेषऑपरेशन सिंदूरमधील सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर

ऑपरेशन सिंदूरमधील सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये समावेश

Google News Follow

Related

भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान हुतात्मा झालेल्या सहा भारतीय जवानांची नावे प्रथमच अधिकृतरीत्या समोर आली आहेत. ही नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या (National War Memorial) अधिकृत वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनर’ विभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाची पहिली अधिकृत नोंद समोर आली आहे.

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावर भारतासाठी विविध युद्धे, लष्करी मोहिमा आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची नोंद ठेवली जाते. याच यादीत आता ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या सहा जवानांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

‘रोल ऑफ ऑनर’मध्ये समाविष्ट झालेले सहा शूरवीर

  • सुभेदार मेजर पवन कुमार
  • रायफलमन सुनील कुमार
  • लान्स नाईक दिनेश कुमार
  • ए. व्ही. मूड मुरलीनायक
  • हवालदार सुनील कुमार सिंग
  • सुरेंद्र कुमार

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या जीवितहानीबाबत अनेक वृत्ते आणि दावे समोर आले होते. काही माध्यमांमधून काही जवानांच्या हौतात्म्याची माहितीही प्रसिद्ध झाली होती. मात्र, केंद्र सरकार किंवा संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये या जवानांची नावे समाविष्ट करण्यात आल्याने, ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांची ही पहिली अधिकृत नोंद मानली जात आहे.

हे ही वाचा:

राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणानंतर चंपत राय यांचा राजीनामा

सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!

स्टेट बँक घोटाळाप्रकरणी श्रीकांत भसींच्या विमा पॉलिसी जप्त

महिलेच्या कारमध्ये घुसून, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय युद्ध स्मारकावर २६ हजारांहून अधिक शहीदांची नावे

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावरील ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये सध्या २६ हजार ६२६ हुतात्म्यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या यादीमध्ये १९४७-४८ मधील भारत-पाकिस्तान युद्ध, त्यानंतरची विविध युद्धे, सीमावर्ती संघर्ष, दहशतवादविरोधी मोहिमा आणि अलीकडील ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांचाही समावेश आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या प्रत्येक जवानाचा सन्मान कायमस्वरूपी जतन करण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा