28 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषभारतीय वंशाच्या नासा वैज्ञानिकाचे हेलिकॉप्टर मंगळावर जाणार!

भारतीय वंशाच्या नासा वैज्ञानिकाचे हेलिकॉप्टर मंगळावर जाणार!

या हेलिकॉप्टरचा वेग १० पटीने अधिक

Google News Follow

Related

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा पुन्हा एकदा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवणार आहे. या हेलिकॉप्टरचे वजन एक किलो ८०० ग्रॅम आहे. नासाने या हेलिकॉप्टरचे नाव इन्जेनिटी ठेवले आहे. ज्याचे टोपण नाव गिन्नी ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प नासाच्या प्रिझर्व्हन्स रोव्हरचा एक भाग आहे, जो सन २०२०मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता. रोव्हर अजूनही मंगळ ग्रहावर सक्रिय आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक डॉ. जे. बॉब बलराम यांनी इन्जेनिटी या हेलिकॉप्टरचे डिझाइन बनवले आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, इन्जेनिटी हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. ते अल्ट्रालाइट वजनाच्या कार्बन फायबरने बनले असून त्याची लांबी केवळ अर्धा मीटर आहे. इन्जेनिटीला उड्डाण करण्यास मदत करणारी हेलिकॉप्टरची पाती २४०० आणि २९०० आरपीएमवर फिरतात. पृथ्वीवर उड्डाण करणाऱ्या कोणत्याही हेलिकॉप्टरच्या तुलनेत या हेलिकॉप्टरचा वेग १०पटीने अधिक आहे.

हे ही वाचा:

ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार

यहोवा विटनेसेस आहेत तरी कोण?

दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला

गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२१ रोजी इन्जेनिटीने सर्वांत प्रथम उड्डाण केले होते. या दरम्यान हेलिकॉप्टर जमिनीपासून सुमारे तीन मीटर उंच उडाले आणि थोडावेळ हवेत फिरून एक वर्तुळ पूर्ण केले. मंगळाच्या अतिशय विरळ वातावरणात नियंत्रित उड्डाण करणे हा मैलाचा दगड मानला जात आहे. पृथ्वीच्या पलीकडे केले गेलेले हे पहिलेच उड्डाण होते.

आतापर्यंत या हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहाच्या विरळ वातावरणात ६४ उड्डाणे घेतली आहेत.
या हेलिकॉप्टरचे डिझाइन बनवणारे मूळ भारतीय वंशाचे डॉ. जे. बॉब बलराम सध्या नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळा म्हणजेच जेपीएलमध्ये कार्यरत आहेत. बलराम यांनी आयआयटी मद्रास येथून मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. ते लवकरच नासातून निवृत्त होणार आहेत. आता त्यांना भारतीय विद्यार्थ्यांना मदत करायची आहे. त्यांच्यासारखे शेकडो भारतीय विद्यार्थी प्रगती करून देशाचे नाव झळकवू शकतात, असा विश्वास ते व्यक्त करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा