31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरविशेषनाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!

नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!

मुंबई-आग्रा महामार्गावर झाला अपघात

Google News Follow

Related

मुंबई आग्रा महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे.जळगावकडून नाशिकला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे.अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली आहे.या दुर्घटनेत १० प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.बसची ट्रकला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ हा अपघात झाला.एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती.तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघात इतका भयानक होता की, एसटीची एक बाजू कापली गेली.त्यामुळे अनेक प्रवासी रस्त्याच्या बाहेर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

शिवसेनेचं ठरलं; उत्तर-पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकरांना लोकसभेचे तिकीट

संदेशखाली प्रकरणातील पीडित, भाजपा उमेदवार रेखा पात्रा यांना ‘एक्स-श्रेणी’चे सुरक्षाकवच

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी

अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत

या अपघातात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर मृतदेहांची ओळख पेटवण्याचे काम सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा