28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषमुंबईत राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची हॅट्ट्रिक!

मुंबईत राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची हॅट्ट्रिक!

Google News Follow

Related

३० मार्च  ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान ४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२१ -२०२२ मुंबई येथील श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर ( पूर्व ) येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत या स्पर्धेचे आयोजन करण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

४७ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा २०१९ साली कुडाळ, ४८ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा २०२० साली जळगाव व ४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा आता मुंबई येथे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने या स्पर्धेच्या आयोजनाची हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम केला आहे. आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत व इंडियन ऑइल, युनियन बँक, ओ. एन. जी. सी. व हिंदुस्थान पेट्रोलियम सहपुरस्कृत या स्पर्धेत २५ राज्यांचे व १२ संस्थांचे मिळून २७ संघ सहभागी झाले आहेत.

पुरुष एकेरी, महिला एकेरी व सांघिक गटासाठी या स्पर्धेत चुरस होणार असून यजमान महाराष्ट्रातील ६ महिला व ६ पुरुष खेळाडूंसहित प्रत्येक प्रत्येक विभागातून अतिरिक्त ८ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. आगामी विश्व् अजिंक्यपद स्पर्धा २०२२ च्या अखेरीस मलेशिया येथे संपन्न होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड, आर बी आय., जैन इरिगेशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ बरोबरच तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणाचे व महाराष्ट्राचे संघ पुऱ्या ताकदीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. वैयक्तिक गटात विश्वविजेते प्रशांत मोरे, योगेश परदेशी, आर. एम. शंकरा, एस. अपूर्वा, रश्मी कुमरे, व इलवझकी या खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

हे ही वाचा:

आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक

प्रवीण दरेकरांना पुन्हा दोन आठवड्यांचा दिलासा!

आता नेहरू संग्रहालय असणार ‘प्रधानमंत्री संग्रहालय’! सर्व प्रधानमंत्र्यांचा होणार योग्य सन्मान

छत्तीसगड मधील बलात्कार, खून प्रकरणात बाबा खान अटकेत!

 

२ वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा जोशात कॅरमची सुरुवात होत असून कॅरम खेळाडू व कॅरम रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेच्या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहेत. शिवाय मुंबईनगरीत होणाऱ्या या स्पर्धेतील गर्दीचा विचार करत असोसिएशनने प्रेक्षकांसाठी २ मोठे एल. इ. डी. स्क्रीन लावण्याची व्यवस्था केली आहे.

रियाझ आणि मैत्रेयी महाराष्ट्राचे कर्णधार

या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्र कॅरम असोसिएशन भूषवित असल्याने यजमान म्हणून संघातील ६ खेळाडूं व्यतिरिक्त महाराष्ट्रातील ८ महिला  व ८ पुरुष अतिरिक्त खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत.
 
महाराष्ट्राचा पुरुष संघ : रियाझ अकबर अली ( कर्णधार ), संदीप दिवे, सागर वाघमारे, यासिन युसूफ शेख, अभिषेक चव्हाण, फय्याज शेख  संघ व्यवस्थापक : संजय देसाई 
अतिरिक्त पुरुष खेळाडू : सय्यद मेहदी हसन, सय्यद मोहसीन कासीम, संजय मांडे, किशोर भोंडवे, मुकेश शर्मा, सुदेश वाळके, मंगेश पंडित, रवींद्र पवार 
 
महाराष्ट्राचा महिला संघ : मैत्रेयी गोगटे ( कर्णधार ), केशर निर्गुण, आकांक्षा कदम, श्रुती सोनावणे, समृद्धी घाडीगावकर, प्राजक्ता नारायणकार संघ व्यवस्थापक : वीणा चव्हाण 
अतिरिक्त महिला खेळाडू : मानसी शिंदे, शोभा कामत, वैभवी शेवाळे, मिनल लेले – खरे, सिमरन शिंदे, दिक्षा चव्हाण, मधुरा देवळे, स्पृहा लिंगायत,  
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा