31 C
Mumbai
Monday, May 13, 2024
घरविशेषतब्बल अडीच वर्षाने परतली टी-४२ वाघीण!

तब्बल अडीच वर्षाने परतली टी-४२ वाघीण!

सातपुडा राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापकाकडून बेपत्ता वाघीण टी-४२ चा व्हिडिओ शेअर

Google News Follow

Related

सातपुडा व्याघ्र प्रकल्पात गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेली टी-४२ वाघीण परतली आहे. वाघिणीच्या परतीची बातमी समजताच उद्यानातील संपूर्ण टीममध्ये आनंदाची लाट उसळली. एसटीआर(सातपुडा राष्ट्रीय उद्यान) व्यवस्थापनाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर बेपत्ता वाघीण टी-४२ चा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

व्हिडिओ जारी करताना सातपुडा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने लिहिले आहे की, हरवलेली वाघीण अडीच वर्षांनंतर परतली आहे. टी-४२ नावाच्या या वाघिणीला बांधवगड व्याघ्र प्रकल्पातून २०२० मध्ये सातपुडा येथे हलवण्यात आले होते.तिथे या वाघिणीने पर्यटन आणि गैर-पर्यटन क्षेत्रांचा समावेश करून आपले स्थान स्थापित केले होते.ती पर्यटकांसोबत आरामदायक होती आणि ती अनेकदा दिसली होती. त्यानंतर २०२१ च्या उन्हाळ्यात ती अचानक गायब झाली. त्यांनतर संपूर्ण उद्यानात गस्त घातली परंतु तिचा आम्हाला पत्ता लागला नाही.तसेच उद्यानात लावलेल्या कोणत्याही कॅमेरा ट्रॅपमध्येही ती दिसत नव्हती.

हे ही वाचा:

झारखंड काँग्रेस खासदाराच्या घरात सापडले १०० कोटी रोख!

काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती

फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने

झिम्बाब्वे-आयर्लंड दरम्यान झाला रोमांचक सामना!

 

त्यांनतर ४ डिसेंबर २०२३ रोजी पायी चालणाऱ्या गस्ती पथक जंगलात गस्त घालत असताना त्यांना अचानक वाघिणीचा कर्कश आवाज ऐकू आला.त्यांनतर पथक आपल्या छावणीत गेले.त्याच दिवशी दुपारी छावणीजवळ वाघिणीचा गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला.पथकाने गाडी घेऊन शोध मोहीम सुरु केली.टी-४२ वाघीण जंगलातून आपल्या दिशेने येताना पाहून गस्ती घालणाऱ्या वन पथकाला विश्वास बसला नाही.त्यांनतर पथकाने खात्री करण्यासाठी वाघिणीचे फोटो आणि व्हिडिओ काढले.शेवटी हरवलेली टी-४२ वाघीण परत आल्याचे निष्पन्न झाले.एसटीआर(सातपुडा राष्ट्रीय उद्यान) व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, टी-४२ वाघीण परत आली आहे. सर्व वन्यजीव प्रेमींसाठी ही खरोखर आनंदाची बातमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा