27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरविशेषनीतिश कुमार एनडीएसोबतच राहणार

नीतिश कुमार एनडीएसोबतच राहणार

निवडणूक निकाल येऊ लागल्यावर काँग्रेससोबत जाण्याच्या चर्चेला विराम

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना आता सत्ता मिळविण्यासाठी जमवाजमव करण्याची तयारी सुरू झाली आहे. एनडीएचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता असताना एनडीएचे सदस्य असलेले राष्ट्रीय जनता दल (युनायटेड) पक्षाचे नेते नीतिश कुमार यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेस करू पाहात आहे. मात्र नीतिशकुमार यांच्याकडून आपण एनडीएचेच घटकपक्ष राहणार असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आला आहे.

निवडणूक निकालात एनडीए आता २९८ च्या आसपास असताना काँग्रेसने नीतिशकुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे नीतिश कुमार हे इंडी आघाडीसोबत जातील का असे म्हटले जात आहे, पण जेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी या सगळ्या गोष्टींचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एनडीएसोबतच आहोत आणि एनडीएच्या सोबतच यापुढेही आहोत. जेडीयूने बिहारमध्ये दमदार यश मिळविले. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून आपल्यासोबत येण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला.

हे ही वाचा:

हा निकाल परिवर्तनाला पोषक

मध्यप्रदेशातून शिवराज सिंह चौहान तब्बल ६ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

मुख्य प्रशिक्षक म्हणून टी २० विश्वचषक ही द्रविडची शेवटची स्पर्धा!

‘हमारे बारह’च्या टीमला पोलिस संरक्षण

दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू यांच्याशीही संपर्क साधल्याचे कळते. शरद पवारांना यासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्यांनी नीतिश कुमार यांच्याशी संपर्क केलेला नसल्याचे सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा