29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषव्ही. एन. देसाई रुग्णालयांतील भूलतज्ज्ञ गेले कुठे ?

व्ही. एन. देसाई रुग्णालयांतील भूलतज्ज्ञ गेले कुठे ?

वरिष्ठ भूलतज्ज्ञांच्या गलथान कारभारामुळे रुग्णांना इतरत्र शस्त्रक्रियेसाठी जावे लागत आहे.

Google News Follow

Related

सांताक्रूझ येथील पालिकेच्या व्ही. एन. देसाई रूग्णालयामध्ये अपुऱ्या भूलतज्ज्ञाच्या तुटवड्यामुळे ४ गर्भवती महिलांना इतर रुग्णालयामध्ये हलवावे लागले. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात भूलतज्ज्ञ असणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची भूलतज्ज्ञांपायी ताटकळत राहावे लागते. त्यामुळे वेळप्रसंगी शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागते. परिणामी, पालिकेच्या रुग्णालयात प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल रुग्णाचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.

वरिष्ठ भूलतज्ज्ञांच्या गलथान कारभारामुळे व्ही. एन. देसाई रुग्णालयात १० सप्टेंबर रोजा दुपारी ४ वाजता भूलतज्ज्ञ अनुपस्थित होते. परिणामी वरिष्ठ भूलतज्ज्ञांनी या कामाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे होते. तसे न करता ४ गर्भवती महिलांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयातमध्ये हलवण्यात आले. देसाई रुग्णालयाने या महिलाना तिथे नेण्याऐवजी भूलतज्ज्ञाची व्यवस्था केली असती तर, नाहक त्रास गर्भवतींना झाला नसता. असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी

“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

दरम्यान, जोगेश्वरी रुग्णालयात ५ भूलतज्ज्ञ आहेत. व राजावाडी रुग्णालयात तीन, तर कूपरसारख्या वैद्यकीय महाविद्यालयात चार भूलतज्ज्ञ आहेत. तसेच कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात ६ तर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात ९ भूलतज्ज्ञ आहेत. त्यामानाने रुग्णसंख्येच्या उपस्थितीत भूलतज्ज्ञाची उपस्थिती असमाधानधारक आहेत. गरज नसतानाही कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालयात १ भूलतज्ज्ञ आहे. व बंद स्थितीत असलेल्या एमटी रुग्णालाय व सिद्धार्थ रुग्णालय यामध्ये १ भूलतज्ज्ञ देण्यात आले आहे. परिणामी उपनगरातील रुग्णाचा भार सहन करणाऱ्या व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये मात्र रुग्णांना भूलतज्ज्ञाअभावी इतर ठिकाणी धावाधाव करावी लागते. त्यामुळे रुग्णाची व नातेवाईकांना हेळसांड होऊन, नाहक त्रास सहन करावा लागतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा