28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषइस्रायल हमास युद्धामुळे येशूच्या जन्मस्थळाकडे पर्यटकांची पाठ!

इस्रायल हमास युद्धामुळे येशूच्या जन्मस्थळाकडे पर्यटकांची पाठ!

ना ख्रिसमस ट्री , ना ख्रिसमसचा उत्साह, बेथेलहेम शहरच ख्रिसमससाठी बंद, स्थानिक व्यापारी

Google News Follow

Related

जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.ख्रिश्चनांचा प्रभू येशूंचा आज २५ डिसेंबर जन्मदिवस आहे.या दिवशी सर्वात मोठा उत्सव बेथलेहेम शहरात पार पडतो. बेथलेहेम या ठिकाणी प्रभू येशूचा जन्म झाला असे ख्रिश्चन समुदायाचे लोक मानतात.मात्र, यावेळी या ठिकाणी सर्वत्र शांतता पसरलेली पाहायला मिळत आहे.इस्रायल- हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे या ठिकाणी कोणी येत नाही.इस्रायली हल्ल्यांमुळे पर्यटक आणि यात्रेकरू पॅलेस्टिनी शहराला भेट देण्यासाठी घाबरत असल्याची माहिती समोर आली आहे.

बेथलहेम शहर इस्रायल-व्याप्त वेस्ट बँक, पॅलेस्टाईनमधील एक शहर आहे, जेरुसलेमच्या दक्षिणेस सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसपर्यंत पॅलेस्टिनीमधील बेथेलहेम शहर गजबजलेले, आनंदी आणि व्यस्त होते.मात्र, यावेळी दोन्ही देशांच्या युद्धामुळे हे शहर ओसाड पडले आहे.गोळ्यांच्या तडाख्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.पर्यटकांच्या अनुपस्थितीमुळे शहरातील हॉटेल, दुकाने सुनसान झाली आहेत.बेथेलहेम शहर जगभरातील पर्यटकांवर खूप अवलंबून आहे.’चर्च ऑफ द नेटिव्हिटी’ पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात.ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणी प्रभू येशूंचा जन्म झाला.

हे ही वाचा:

७०० रुपयात थार गाडी दिली तर माझे दिवाळेच निघेल!

अडवून ठेवलेले विमान ३०० प्रवाशांसह करणार उड्डाण!

हिजाब बंदी उठवायची की नाही; काँग्रेस सरकार गडबडले

चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!

शहरातील व्यापारी सांगतात की, दोन्ही देशांच्या युद्धामुळे शहरात कोणी येत नाहीये.शहरातील स्थानिक अलेक्झांडर हॉटेलचे मालक जॉय कॅनवती म्हणाले की, आमच्याकडे कोणी पाहुणे येत नाहीत.कोणीही येत नाहीत.येथील शहरातील बहुतांश लोकसंख्या पर्यटनावर अवलंबून आहे.हा आतापर्यंतचा सर्वात वाईट ख्रिसमस आहे, ते म्हणाले.ना ख्रिसमस, ना ख्रिसमस ट्री, ना ख्रिसमसचा उत्साह, बेथेलहेम शहरच ख्रिसमससाठी बंद आहे, ते पुढे म्हणाले.
दरम्यान, इस्रायल- हमास युद्धादरम्यान आतपर्यंत २० हजार हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा