दिल्ली सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत १,३८८ नर्सेस आणि ४१ पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीची नियुक्ती दिली आहे. सोमवारी मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून दिल्लीतील मागील सरकारांनी राजधानीतील लोकांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या नव्हत्या. हे एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण अनेक वर्षांनी १,३८८ नर्सेसना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘आयुष्मान भारत योजना’साठी नोंदणी व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. ही व्हॅन नागरिकांच्या दारात आरोग्यसेवा पोहोचवण्याचा उद्देश घेऊन सुरू करण्यात आली आहे. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला आयुष्मान भारत कार्डासाठी नोंदणी करता यावी आणि त्यांना देशाच्या सर्वात मोठ्या आरोग्य सुरक्षा योजनेशी जोडता यावे, यासाठी ही सुविधा दिली जात आहे.
हेही वाचा..
नार्को-आतंकवाद, टेरर फंडिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल
युनियनची निवडणूकच नाही, मग कॉलेजमध्ये ऑफिस का?
केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रकोप
पोट, बाहूंना बळकट करून तणाव दूर करणारे ‘काकासन’
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्या भाषणात मागील सरकारांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले, “दिल्ली देशाची राजधानी असूनही मागील २७ वर्षांत प्रत्येक १,००० लोकसंख्येगणिक केवळ ०.४२ रुग्णालयातील खाटांची उपलब्धता होती. म्हणजेच, नागरिकांसाठी पुरेश्या आरोग्य सेवा उपलब्ध नव्हत्या. “३८ सरकारी रुग्णालयांमध्ये फक्त ६ एमआरआय मशीन आणि १२ सीटी स्कॅन यंत्रे होती. औषधे, उपकरणे, तंत्रज्ञान, डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ यांची प्रचंड कमतरता होती. रुग्ण येत असत, पण त्यांना गेटवरूनच परत पाठवले जात असे.”
रेखा गुप्ता यांनी मागील आम आदमी पक्ष सरकारवर गंभीर आरोप करताना सांगितले, “हे लोक ‘वर्ल्ड क्लास हेल्थ मॉडेल’च्या नावाने प्रचार करत होते. पण ‘मोहल्ला क्लिनिक’च्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. औषधांचे अवाजवी बिल तयार करण्यात आले. या क्लिनिकमध्ये काम करणारे कर्मचारी रुग्णांची संख्या मोजत असत, कारण सरकारने प्रत्येक रुग्णाच्या नोंदणीवर ४० रुपये देण्याचे वचन दिले होते. “अशा परिस्थितीत एका दिवसात २०० रुग्णांचे नोंदणीपत्र तयार केले जात होते. औषध खरेदी, कर्मचार्यांचे कॉन्ट्रॅक्ट, रुग्णालयांची इमारत उभारणी या सर्व बाबींमध्ये भ्रष्टाचार झाला,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
