29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेष२०३२ चे ऑलिम्पिक 'या' शहरात होणार...

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

Google News Follow

Related

यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. टोक्यो येथे २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा मागील वर्षी कोरोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलया होत्या. यंदा जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने मिळून या स्पर्धा सर्व काळजी घेऊन खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच २०३२ साली ऑलम्पिक खेळवण्यात येणारा देश फायनल करण्यात आला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने याबाबतची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहराला २०३२ च्या ऑलम्पिक स्पर्धा खेळवण्याचा मान देण्यात आला आहे. हा मान ब्रिस्बेनला मिळणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. पण बुधवार समितीने दिलेल्या निर्णयात यावर शिक्कामोर्तब झाले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसमध्ये दिलेल्या माहितीत म्हटलं, ‘आम्हाल याआधी ऑलम्पिक खेळ कसे खेळवायचे, कसं आयोजन करायचं याचा अनुभव आहे. २०२४ मध्ये पॅरिस आणि  २०२८ मध्ये लॉस एंजेलीसमध्ये ऑलम्पिक खेळ होणार आहेत. त्यानंतर २०३२ साठी ब्रिसबेनने नव्या बिडिंग सिस्टममध्ये विजय मिळवला. त्यामुळे हा मान आम्गहाला मिळाला आहे.”

ऑलम्पिक सारखी भव्य स्पर्धा खेळवण्याचा मान ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा मिळाला आहे. याआधी १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ऑलम्पिक खेळ खेळवण्यात आले होते. तर त्यानंतर २००० साली सिडनी येथे ऑलम्पिक खेळांचे आयोजन झाले होते. त्यानंतर आता ३२ वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हा मान मिळाला आहे.

हे ही वाचा:

प्राथमिक शाळा सुरु कराव्यात

इराकमध्ये आयएसआयएस डोकं वर काढतंय?

काय होता राज कुंद्राचा पॉर्न ‘प्लॅन बी’?

६७% भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज

२०३२ च्या ऑलम्पिक खेळांसाठी ब्रिसबेनचे नाव घोषित करताच तेथील नागरिकांना खूप आनंद झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले. यावेळी ब्रिसबेनमधील नागरिकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा