30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषभारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा

भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा

Google News Follow

Related

देशात सध्या कोविडने हाहाकार माजवला आहे. अनेक वैद्यकीय सुविधांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यात विशेषत्वाने प्राणवायूचा तुटवडा देशात जाणवत आहे. अशावेळेस देशवासियांच्या मदतीला रिलायन्स समूह धावला आहे. रिलायन्सने आपल्या वैद्यकिय ऑक्सिजनच्या निर्मितीत लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे भारतातील सुमारे १० पैकी १ रुग्णाला रिलायन्स निर्मीत प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे.

रिलायन्सने आपल्या प्राणवायूच्या उत्पादनात भरघोस वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली आहे. ते लवकरच देशातील सर्वात मोठे प्राणवायू उत्पादन बनण्याच्या मार्गावर आहेत. देशातील एकूण प्राणवायू उत्पन्नाच्या ११% उत्पादन रिलायन्स समुहाकडून केले जात आहे.

हे ही वाचा:

चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी

योगी सरकारने मागवल्या १ कोटी लसी

भारतात आज दाखल होणार स्पुतनिक लस

शीतल जोशी-कारूळकर सेन्सॉर बोर्डावर

रिलायन्सने आपले ऑक्सिजन उत्पादन जवळपास शुन्यापासून ते १००० मेट्रीक टन पर्यंत वाढवले आहे. एवढा ऑक्सिजन साधारणपणे किमान १ लाख रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी स्वतः जातीने जामगनगर येथे प्राणवायूचे उत्पादन आणि वहन यासाठी लक्ष घालत आहेत. मागच्या महिन्यात एप्रिल २०२१ मध्ये रिलायन्सने १५,००० मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा केला होता. ज्याचा सुमारे १५ लाख रुग्णांना फायदा झाला.

या सर्वांबरोबरच रिलायन्सने २४ ऑक्सिजन वहनास योग्य टँकर देखील मागवले होते. ज्यामुळे देशाच्या एकूण वहनक्षमतेत ५० मेट्रीक टनांची भर पडली होती. यासाठी आराम्को, बीपी आणि आयएफ या कंपन्यांनी हे टँकर पुरवले होते. त्याशिवाय येत्या काही दिवसात रिलायन्स आणखी काही टँकर भारतात आणणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा