तीन वर्षापूर्वी ‘धो डाला अब उठेगा नाही साला’ हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो. दाढीवरून आर्धाच हात फिरविला तेव्हा ते आडवे झाले. त्यातून ते आजून सावरले नाहीत. आता कोणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उठेगा नही असे डायलॉग त्यांना शोभत नाही. मनगटात जोर लागतो तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही. एकाने मराठी बद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली तरी दुसऱ्याने सत्तेसाठी-खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर केली. ठाकरे बंधूंच्या आजच्या मेळाव्यावरून त्यांनी ही टिप्पणी केली.
आम्ही मान्यता दिलेले राज्यगीत वाजवून त्यांनी कार्यक्रमाची सुरवात केली, यासाठी त्यांचे अभिनंदन. महायुती सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले, पंतप्रधान मोदींनी त्याला मंजुरी दिली. मराठी भाषा, मराठी माणसांसाठीचा आजचा जो मेळावा होता त्यात त्यांच्या भाषणातून एक आगपखड, जळजळ, द्वेष, मळमळ होती, ती दिसून आली. मराठी माणूस मुंबईमधून बाहेर का गेला, याचे त्यांनी पहिला उत्तर दिले पाहिजे. आरोपला मी कामातून उत्तर देतो. म्हणून मुख्यमंत्री झालो, विधानसभेत मोठे यश मिळाले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, दाढीवरून आर्धाच हात फिरविला तेव्हा त्यांची अशी अवस्था झाली पूर्ण हात फिरविला असता तर काय झालं असतं. ‘फ्लॉवर का फायर’ हे पुढच्या निवडणुकीत कळेल. लोकशाहीत कोणालाही युती करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तशा अनेक घटना दिसतील.
हे ही वाचा :
काँग्रेसवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही
डोक्याला घोडा लावून वाटाघाटी नकोत; २टक्क्यांचा माज सहन करणार नाही
भारतीय राजकारणातील शिखर पुरुष बाबू जगजीवन राम
तिबेटच्या स्वातंत्र्याचा का भारतासाठीही महत्त्वाचा
मराठी भाषेवरून हे माफी मागतील असे आम्हाला वाटले होते. कारण त्यांच्या काळातच हिंदी अनिवार्य करण्याचे काम झाले होते. डॉ. माशेलकर यांचा अहवाल स्वीकृत केला, मान्यता दिली. याविरुद्ध आम्ही मात्र अनिवार्य हा शब्दच काढून टाकला. हिंदीला स्थगिती दिली, जी आर रद्द केले. त्यामुळे माफी मागणार याची अपेक्षा होती परंतु त्यांनी तसे केले नाही. २०१९ ला बाळासाहेबांचे यांनी विचार सोडले म्हणूनच जनतेने यांना विधानसभेत धोपटले. तर जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
