35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषवस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीत जाते आहे म्हणत विरोधकांची रडारड

वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीत जाते आहे म्हणत विरोधकांची रडारड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविला आरसा

Google News Follow

Related

मुंबईत असलेल्या वस्त्रोद्योग आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकारी दिल्लीला जाणार आहेत. केंद्र सरकारने त्यांना दिल्लीत बोलावले असून तिथे वस्त्रोद्योग मंत्रालयाची तांत्रिक बाजू अधिक भक्कम करण्यासाठी आयुक्तांसह एकूण पाच अधिकाऱ्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले असून वस्त्रोद्योगाचे कार्यालयही दिल्लीत जात असल्याबद्दल काही नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण देत वास्तव काय आहे हे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबई महानगराला मँचेस्टर ऑफ इंडिया असे म्हटले जात होते. तेव्हापासून मुंबईत वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय होते पण आता हे कार्यालय हलवले जात आहे. मुंबई आर्थिक सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. त्यांनी ट्विट करत मुद्दा उपस्थित केला की, १९४३मध्ये उद्योग कार्यालयाची भारतात स्थापना झाली. पण आता २०२३मध्ये हे कार्यालय मुंबईतून हटविले जात आहे. उद्या आपला आनंदाचा पाडवा आहे पण आपल्यासाठी दुःखद बातमी आहे की टेक्स्टाइल आयुक्त कार्यालय दिल्लीला जात आहे.

हे ही वाचा:

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

राष्ट्रीय महिला कबड्डीसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व पूजा यादवकडे

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!

यातून मुंबईचे नुकसान होणार नाही पण माझ्या घरातील गोष्ट तुम्ही उचलून नेत आहात, माझ्या घराचा अभिमान नेत आहात. हे सगळे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून होते आहे.

भास्कर जाधव यासंदर्भात म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त दिल्लीला जात असल्यामुळे आपल्याला धक्का बसला. मुंबई ही गिरणी कामगारांची आहे. विदर्भात कापूस उत्पादन होते. महाराष्ट्राला उभारी देण्यासाठी वस्त्रोद्योगाची गरज आहे. जर हे कार्यालय दिल्लीला गेले तर महाराष्ट्र खिळखिळा होईल.

यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. अतिरिक्त सचिवांनी माहिती दिली आहे वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मुंबईतील कार्यालयात ५०० कर्मचारी आहेत. केवळ वस्त्रोद्योग आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना दिल्ली मुख्यालयात काही दिवस काम करण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाचे पुनर्बांधणी आणि सक्षमीकरण यासाठी काही दिवस त्यांना बोलावले आहे. कार्यालय हलविण्याचा कोणताही निर्णय नाही.

फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणामुळे जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांचे यासंदर्भातील वक्तव्य हे तथ्यहीन होते हे स्पष्ट झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा