लहानग्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे ‘चिल्ड्रन्स आर्ट पेंटिंग शो २०२३’चे आयोजन करण्यात येणार आहे. लहान मुलांमधील सुप्त कलागुणांना यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. एस पी मेमोरिअल ट्रस्टकडून या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. वय वर्षे ६ ते वय वर्षे १८ या वायोगातील मुलांना या प्रदर्शनासाठी आपली चित्रे पाठविता येणार आहेत. मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ त्या वेळेत प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. रविवार, ५ नोव्हेंबर पर्यंत इच्छुक मुलांनी त्यांची चित्रे जमा करण्याचे आवाहन एस पी मेमोरिअल ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नवाझ शरीफ यांच्या विमानात चोरी
पोलिसांच्या गाडीने चार जणांना उडवलं
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
संबंधित मुलांची चित्रे ही सहा दिवसांसाठी प्रदर्शनात ठेवण्यात येतील. याचा आकार २ फूट x २ फूट पेक्षा जास्त नको, त्यापेक्षा कितीही लहान चालेल. चित्र साध्या पेपरवर किंवा कॅनवास वर चालेल. गॅलरीत चित्र लावण्यासाठी माउंटिंग आणि हँगिंग संस्थेतर्फे करण्यात येते. सहभागी सर्व मुलांना एस पी मेमोरिअल ट्रस्टकडून पदक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत ७ ते १३ नोव्हेंबर २०२३ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल.