झारखंडमध्ये सुरक्षा दलांनी आठ नक्षलवाद्यांना ठार मारल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. सोशल मिडीयावर पोस्टकरत नक्षलवाद संपवण्याची आमची मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. बोकारो जिल्ह्यात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या कोब्रा कमांडोशी झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. विशेष म्हणजे, या आठ नक्षलवाद्यांमध्ये एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवादीचाही समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले, नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत आज सुरक्षा दलांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. झारखंडमधील बोकारो येथील लुगू हिल्स येथे झालेल्या चकमकीत ८ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, ज्यात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक उच्चस्तरीय नक्षलवादी नेता विवेक आणि इतर दोन कुख्यात नक्षलवादी यांचा समावेश आहे. ही कारवाई सुरूच आहे. आमच्या सुरक्षा दलांचे कौतुक करा, असे गृहमंत्र्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
बेंगळुरूत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर युवकाने केला चावीने हल्ला!
परकोट्यातील शिव मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना
राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत १० दिवसांत उत्तर द्या!
भारतीय महिला हॉकी संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्याला उड्डाण”
दरम्यान, सुरक्षा दलांच्या या कारवाईची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०९ कमांडो ‘बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शनच्या’ (कोब्रा) सैनिकांनी राज्य पोलिसांच्या सहकार्याने एक कारवाई केली, ज्यामध्ये आठ नक्षलवादी मारले गेले. या कारवाईत एक एके सीरिज रायफल, तीन इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (एसएलआर), आठ देशी बनावटीच्या बंदुका आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले.