29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरविशेषरोलरकोस्टर अडकले, पर्यटक उलटे लटकले

रोलरकोस्टर अडकले, पर्यटक उलटे लटकले

Related

उन्हाळ्याच्या सुट्टीत रोलरकोस्टरचा आनंद अनेकजण घेतात, पण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे रोलरकोस्टरची मजा घेणाऱ्या पर्यटकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. रोलरकोस्टर मध्येच अडकल्यामुळे उलटे टांगल्याच्या अवस्थेत या पर्यटकांना सुमारे ४५ मिनिटे लटकून पडावे लागले.

रोलरकोस्टरच्या राइडमध्ये एक थरारक अनुभव पर्यटक घेत असतात. वेडीवाकडी आणि उलटसुलट वळणे घेणाऱ्या रोलरकोस्टरची राईड रोमांचक असते. पण कॅरोलिनातील पर्यटकांना मात्र वेगळाच अनुभव आला.

या रोलरकोस्टरच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये काही दोष निर्माण झाल्यामुळे या पर्यटकांचा प्रवास थांबला. पण हे सगळे एका विचित्र परिस्थितीत सापडले. कारण पुढील ४५ मिनिटे हे सगळे उलटे लटकले होते. कारण रोलरकोस्टर उलटे मार्गक्रमण करत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि लोकांना अडकून पडावे लागले. त्यामुळे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत लोक त्यात लटकलेल्या अवस्थेत होते.

फ्लाइंग कोब्रा या नावाने ही रोलरकोस्टर ओळखली जाते. ताशी ५० मैल या वेगाने ती मार्गक्रमण करते आणि ३६० अंशातून तिचा प्रवास होतो. १२५ फूट इतक्या उंचीपर्यंत जाणारी ही रोलरकोस्टरची सफर सहावेळा लोकांना वाकडीतिकडी वळणे घेत फिरवून आणते.

हे ही वाचा:

समर्थ राष्ट्र, सुदृढ समाज

टाटा कंझ्युमर एकदम कडॅक!

तारापूरमध्ये स्टील कारखान्याच्या कामगारांवर जमावाचा हल्ला, १९ पोलीस जखमी

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

 

या पर्यटकांपैकी ब्रँडन ऍलन यांनी सांगितले की, मला माझे अश्रु खाली पडताना दिसत होते. हा भयंकर अनुभव होता. अडकल्यानंतर त्यांनी आम्हाला धीर दिला आणि आमची माफीही मागितली.

कॅरोवाइंड ऍम्युझमेंट पार्कने यासंदर्भा स्टेटमेंट जारी करून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. २०१९मध्येही अशीच घटना घडली होती. त्यात स्मायलर ही रोलरकोस्टर १०० फुटांवर अडकून पडली होती. ती घटना ब्रिटनमध्ये झाली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा