31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषसंविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही!

संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही!

संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही, असे सांगत आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी केली. मुंबईतील भाजपा कार्यालयात आज गुरुवारी (७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत मंत्री रिजिजू बोलत होते. तसेच संसदेत हटवण्यात आलेले जम्मू-काश्मीरचे ३७० कलम पुन्हा लागू होणार नसल्याचेही मंत्र्यांनी म्हटले.

देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र आणि आर्थिक राजधानी मुंबईचे योगदान महत्वाचे आहे. महायुती सरकारच्या काळात अधिक वेगाने विकासकामे होत असून,या कामाची पोचपावती मतदार देतील हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले,  मागास वर्गातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी आतापर्यंत मोठी जबाबदारी सोपवल्याने मी जबाबदारीने सांगू शकतो की, जी व्यक्ती संविधानाचा सन्मान करत नाही त्याच्या हातात संविधानाची प्रत आणि त्याच्या तोंडून संविधान शब्द निघणे हे निषेधार्ह आहे. निळ्या रंगाऐवजी लाल रंगाचे मुखपृष्ठ घालून आत कोरे कागद असलेल्या नकली संविधानाची प्रत राहुल गांधी यांनी नागपुरात नाचवली. त्यांच्या या कृत्याने डॉ. आंबडेकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील.

हे ही वाचा : 

जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड एआय वकिलांशी संवाद साधतात…

हिंदू समाज एकत्र येऊ नये म्हणून काम करणारा संत म्हणजे शरद पवार!

ऍमेझोन, फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांवर ईडीकडून कारवाई; २० ठिकाणी छापेमारी

विधानसभा निवडणुकीसाठी मदत करण्याचे उलेमांचे उबाठा नेत्यांना आश्वासन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाऊ नये यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे नाव यादीतून वगळले होते. महात्मा गांधी आणि इतर काहींनी हे पहिले सरकार निवडणुकीद्वारे होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा कुठे त्यांना देशाचे पहिले कायदा मंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासून नेहरू यांनी डॉ.आंबेडकर यांचा कायम अपमान केला. अखेरीस डॉ. आंबेडकर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे जिथे जाऊन निवडणुका लढवल्या तिथे तिथे काँग्रेसने प्रयत्नपूर्वक त्यांचा पराभव केल्याचे मंत्री रीजीजू त्यांनी सांगितले.

२०१५ पर्यंत काँग्रेसने संविधान दिन का साजरा केला नाही, असा सवालही मंत्री रिजिजू यांनी उपस्थित केला.आणीबाणी लादून तर काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला होता. नेहरू यांनीच सर्वप्रथम आरक्षणाला विरोध केला, याची नोंद संसदेच्या रेकॉर्डमध्ये आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नाकारले होते मात्र जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आले होते हेही लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच भारत देश हा एकसंध राहणार, कलम ३७० पुन्हा येणार नाही. संसदेत हटवण्यात आलेले ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही, असे मंत्री रीजीजू यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा