28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषराजीव गांधींचा 'तो' फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचे निधन

राजीव गांधींचा ‘तो’ फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचे निधन

Related

राजीव गांधी १९८७मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेले असताना त्यांच्यावर तिथल्या नौदल अधिकाऱ्याकडून झालेल्या हल्ल्याचे छायाचित्र सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले होते. ते छायाचित्र काढणारे श्रीलंकेचे छायाचित्रकार सेना विदानागामा यांचे ७६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा त्या छायाचित्राच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत.

३० जुलै १९८७मध्ये राजीव गांधी श्रीलंकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नौदलाच्या गार्ड ऑफ ऑनरला उपस्थित राहिलेले असताना त्यांच्यावर एका जवानाने रायफल उगारली. त्या रायफलच्या दस्त्याने तो राजीव गांधी यांना मारण्याच्या प्रयत्नात होता. पण राजीव गांधी खाली वाकले आणि त्यांनी हा वार चुकविला. त्या जवानाला नंतर ताब्यात घेण्यात आले. राजीव गांधी त्यावेळी बालंबाल बचावले होते. तो दस्ता उचलला असतानाचे छायाचित्र विदानागामा यांनी अचूक टिपले होते. विदानागामा यांनी अनेक प्रमुख न्यूज एजन्सीमध्ये फोटोग्राफर म्हणून काम केले होते. त्यात एएफपीचाही समावेश होता. १९४५मध्ये विदानागामा यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जाणार?

बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

गुरू तसा शिष्य; अमोल मुझुमदारप्रमाणे सुवेदने पदार्पणातच ठोकले द्विशतक

 

ज्या जवानाने राजीव गांधी यांच्यावर हल्ला केला होता त्याचे नाव विजेमुनी विजिता असे होते. तो श्रीलंका नौदलातील खलाशी होता. गार्ड ऑफ ऑनरसाठी जवानांकडे पाहात राजीव गांधी पुढे सरकले तसा त्याने मागून त्यांच्यावर बंदुकीने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. भारताने तामिळ टायगर्सना पाठिंबा दिल्याचा राग या जवानाला होता. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. त्याने दस्त्याने प्रहार केला खरा पण राजीव गांधी यांनी तो चुकवला.

विजेमुनीला सहा वर्षांची शिक्षा झाली आणि नंतर राष्ट्राध्यक्षांनी त्याला दया दाखवत अडीच वर्षांनी त्याची सुटका केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा