बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या लोकांना लोकशाहीच्या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचे अभिनंदन केले आणि त्यांना सर्व कामांपेक्षा मतदानाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले, “पहिले मतदान, नंतर जलपान.” असे म्हणत त्यांनी जनतेमध्ये उत्साह निर्माण केला. “आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. विधानसभा निवडणुकीतील या टप्प्यातील सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी पूर्ण उत्साहाने मतदान करावे. या प्रसंगी, राज्यातील माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. लक्षात ठेवा- प्रथम मतदान, नंतर अल्पोपहार! असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिहार में आज लोकतंत्र के उत्सव का पहला चरण है। विधानसभा चुनावों में इस दौर के सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे पूरे उत्साह के साथ मतदान करें। इस मौके पर पहली बार वोट डालने जा रहे राज्य के अपने सभी युवा साथियों को मेरी विशेष बधाई। याद रखना है- पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2025
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, दरभंगा, सारण, सिवान, गोपालगंज, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पटना, भोजपूर आणि बक्सर या प्रमुख जागांसह १२१ जागांवर मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहार सरकारच्या १४ मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री विजय कुमार सिन्हा हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत.
हेही वाचा..
वाटाघाटी न झाल्यास तालिबानशी युद्धचं! काय म्हणाले पाक संरक्षण मंत्री?
वाळवंटात ‘अखंड प्रहार’ मोहिमेचं प्रदर्शन
राहुल गांधींनी दाखवलेल्या त्या ‘ब्राझिलियन मॉडेल’चे हे आहे सत्य
मतदान सायंकाळी ६ वाजता संपेल आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत कमी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मते, १०.७२ लाख नवीन मतदार आहेत आणि ७.७८ लाख मतदार हे १८- १९ वयोगटातील आहेत. निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार, या मतदारसंघांची एकूण लोकसंख्या ६.६० कोटी आहे. मतदानाच्या दिवसापूर्वी पीठासीन अधिकाऱ्यांनी मतदान एजंटांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुपूर्द केली आहेत.







