28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण

पंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण

Google News Follow

Related

शनिवार, १७ जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधे अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन केले आहे. या प्रकल्पांमध्ये गुजरात सायन्स सिटी मधल्या ॲक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरी, तसेच नेचर पार्क यांचा समावेश आहे. तर त्यासोबत गांधीनगर राजधानी-वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. व्हर्चुअल प्रणालीद्वारे हे उद्घाटन पार पडले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी या प्रकल्पांचे महत्व अधोरेखित केले. केवळ कॉन्क्रीटच्या इमारती उभारणे इतकेच उद्दिष्ट नसून स्वतःचे वैशिष्ट्य असणाऱ्या पायाभूत संरचना निर्माण करणे हे आज देशाचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तर मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी त्यांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्या शिक्षण आणि सर्जनशीलतेलही वाव मिळायला हवा असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. सायन्स सिटी हा असाच प्रकल्प आहे जिथे मनोरंजनाच्या गोष्टींमधून मुलांमधल्या कल्पकतेलाही प्रोत्साहन मिळते.

हे ही वाचा:

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”

संजय राठोडना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट नाही

याच सायन्स सिटीमध्ये उभारण्यात आलेली ॲक्वेटिक्स गॅलरी आणखी आनंददायी ठरणार आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. केवळ भारतातलेच नाही तर आशियामधल्या अव्वल मत्स्यालयांपैकी हे एक आहे. जगभरातील सागरी जैवविविधता एकाच ठिकाणी पाहायला मिळणे हा एक अद्भुत अनुभव असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

तर नव्या रोबोटिक्स गॅलरीबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. “रोबोटिक्स गॅलरीत रोबोटशी संवाद साधणे हे आकर्षणाचे केंद्र आहेच , मात्र त्याचबरोबर आपल्या तरुणांना रोबोटिक्सच्या क्षेत्रात काम करण्यास प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मनात कुतूहल निर्माण करेल.” असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा