पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (५ फेब्रुवारी) महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. पंतप्रधान मोदिनी भगवे रंगाचे वस्त्र परिधान करून पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. पंतप्रधान मोदींनी स्नान केल्यानंतर गंगेला नमन केले आणि सूर्यदेवाला नैवेद्य दाखवला. संगमच्या काठावर गंगेची पूजा केली आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली.
पंतप्रधान मोदी प्रयागराज विमानतळावर उतरले आणि तेथून हेलिकॉप्टरने डीपीएस शाळेच्या मैदानावर पोहोचले. यानंतर, पंतप्रधान अरैल घाटावरून बोटीने संगम नाक्यावर पोहोचले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी त्रिवेणी संगमात रुद्राक्षाची माळ हातात धरून, संस्कृत मंत्रांचा जप करत प्रार्थना केली, त्यानंतर नेव्ही ब्लू कुर्ता, काळा जॅकेट आणि हिमाचली लोकरीची टोपी घालून आरती केली. दरम्यान, संगमच्या काठावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान मंदिर अक्षयवट येथे न जाताच परतले. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी अनेक आखाड्यांमधील संतांची भेट घेवून संवाद साधणार आहेत.