33 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
घरविशेषप्रत्येक हॉकी खेळाडूसाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट

प्रत्येक हॉकी खेळाडूसाठी पंतप्रधान मोदींचे खास ट्विट

Google News Follow

Related

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीचा आनंद साऱ्या देशाकडून साजरा केला जात आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण या सगळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटके अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी एक खास ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. भारतीय हॉकीच्या ऑलिम्पिक चमूतील प्रत्येक भारतीय खेळाडूला उद्देशून लिहिलेले हे ट्विटमधून त्या खेळाडूची खासियत अधोरेखित केली आहे. पंतप्रधानांचा हा हटके अंदाज साऱ्यांनाच खूप भावला. देशभरातून पंतप्रधानांच्या या ट्विट्सना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

हे ही वाचा:

सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक

महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करूनही का ट्रोल झाला फरहान अख्तर?

हे सरकार नेमके कोणाचे?

या आधी सकाळी पंतप्रधान मोदींनी भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंशी फोनवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय संघाच्या कर्णधार मनप्रीतशी तसेच प्रशिक्षकांशी संवाद साधत त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘साऱ्या देशाला तुमचा अभिमान आहे’ असे मोदी म्हणताना दिसत आहेत. तर उपांत्य फेरीत पराभवाचा सामाना केल्यानंतर पंतप्रधानांशी केलेल्या संवादातून आपल्याला बळ मिळाले आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे भारतीय खेळाडू सांगताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
141,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा