28 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेषव्याघ्रदिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महत्वाचा संदेश! म्हणाले...

व्याघ्रदिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महत्वाचा संदेश! म्हणाले…

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्ताने एक विशेष संदेश दिला आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या माध्यमातून मोदींनी ट्विट करत हा संदेश दिला. यावेळी त्यांनी व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्याच पण वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

२९ जुलै हा दिवस जगभर व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षी साजरा होणारा हा दिवस भारतासाठी कायमच विशेष असतो. याचे मुख्य कारण म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जगातील जवळपास ७० टक्केपेक्षा अधिक वाघांचे वास्तव्य हे भारतात दिसून येते. भारत कायमच व्याघ्र संवर्धन आणि त्याच्या प्रचार-प्रसारासाठी आग्रही आणि अग्रेसर असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज आपल्या संदेशातून हेच अधोरेखित केले.

हे ही वाचा:

वाघाला दत्तक घ्या ३ लाखात

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण

भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्राणी प्रेमींना आणि त्यातही प्रामुख्याने व्याघ्र संवर्धनासाठी काम करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. भारत हा जगातील ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाघांचे निवासस्थान आहे आणि या भूमीत त्यांचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मोदींनी म्हटले. तसेच व्याघ्र स्नेही परिसंस्थेचे जतन करण्याची कटिबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

१८ राज्यात पसरलेल्या ५१ व्याघ्र राखीव क्षेत्रांची भारत ही भूमी आहे असे पंतप्रधान म्हणाले. २०१८ साली झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले असेही त्यांनी नमूद केले. तर सेंट पिट्सबर्ग घोषणा पत्रानुसार निश्चित करण्यात आलेले व्याघ्र संवर्धना बाबतचे उद्दिष्ट भारताने वेळेच्या चार वर्ष आधीच पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या व्याघ्र संवर्धन धोरणात स्थानिक समुदायांना सहभागी करून घेण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. तर निसर्गासोबत सौहार्दपूर्ण सहअस्तित्व ठेवण्याच्या प्राचीन भारतीय परंपरा आणि मूल्यांपासून आम्ही प्रेरणा घेतली आहे असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा