पश्चिम बंगालमधील दुर्गापूर सामुहिक बलात्कार प्रकरणावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रात्रीच्या वेळी मुलींनी बाहेर जाऊ नये, असे वादग्रस्त विधान केले. यावरून टीका होत असतानाचं आता तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, महिलांनी रात्री उशिरा बाहेर जाऊ नये; पोलिस प्रत्येक इंचावर सुरक्षा देऊ शकत नाहीत.
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील बलात्कारावर बोलताना सांगितले की, घटना उघडकीस आल्यानंतरच पोलिस कारवाई करू शकतात. त्यांनी महिलांना सावध राहण्याचे आवाहनही केले. शुक्रवारी रात्री दुर्गापूर येथील तिच्या संस्थेच्या कॅम्पसबाहेर काही पुरूषांनी ओडिशाच्या जलेश्वर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या दोन दिवसांनंतर ही टिप्पणी आली आहे. “बंगालमध्ये अशा घटना दुर्मिळ आहेत. बंगालमध्ये महिलांची सुरक्षितता इतर कोणत्याही राज्यांपेक्षा चांगली आहे. पण महिलांनी उशिरा महाविद्यालये सोडू नये कारण पोलिस सर्वत्र गस्त घालू शकत नाहीत,” असे तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी केले.
हेही वाचा..
शेख हसीना यांच्यासह ११ जणांच्या अडचणी वाढल्या
दुर्गापूर प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक!
हजारीबागमध्ये नक्षलवाद्यांच्या अड्ड्यांवर छापा
नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात एक जवान जखमी
“प्रत्येक इंचावर सुरक्षा पुरवता येत नाही. प्रत्येक रस्त्यावर पोलिस तैनात करता येत नाहीत. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस कारवाई करू शकतात म्हणून, महिलांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे,” असे ते पुढे म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्गापूर मेडिकल कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता रात्री १२:३० वाजता कशी बाहेर आली असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. ममता बॅनर्जी यांनी महिलांना रात्री उशिरा बाहेर न पडण्याचा सल्ला दिल्यानंतर भाजप आणि सीपीआय(एम) यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.







