25 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरविशेषमुंबईत १.५ लाख घरगुती अन ६५०० सार्वजनिक गणपतींचे विसर्जन, पोलीसही सज्ज

मुंबईत १.५ लाख घरगुती अन ६५०० सार्वजनिक गणपतींचे विसर्जन, पोलीसही सज्ज

सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची माहिती

Google News Follow

Related

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज असून, उद्याच्या (५ सप्टेंबर) विसर्जनासाठी तब्बल १.५ लाखांहून अधिक घरगुती गणपती आणि सुमारे ६५०० सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जित करण्यात येणार आहेत, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

पोलीस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, विसर्जनासाठी ६५ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि २०५ तलावांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, तसेच लाईफगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. यासह १०,००० सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण मुंबईत कार्यरत असतील.

पोलीस बंदोबस्तामध्ये १० अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी, ४० पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाचे अधिकारी, ३००० निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि १५,००० पोलीस शिपाई तैनात असणार आहेत. यासह SRPF (राज्य राखीव पोलीस बल) – १४ तुकड्या, CAPF (केंद्रीय राखीव पोलीस बल) – ४ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक (Riot Control), QRT, BDDS इत्यादींना तैनात करण्यात येत आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

कर्नाटक काँग्रेस अगतिक, इव्हीएम नको, मतपत्रिकांवर घ्या निवडणुका!

बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकार घाबरलंय!

पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा मुंबई पोलिसांना मिळाला मेसेज!

“B फक्त बिडीच नाही, बुद्धिमत्ताही दर्शवते, जी कॉंग्रेसकडे नाही”

वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ४ उपायुक्त आणि २८६५ वाहतूक पोलीस कर्मचारी रस्त्यावर असतील. गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच, ५२गर्दीची ठिकाणे निश्चित करून वाहतूक नियमनासाठी टॉवर उभारले आहेत. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या १२ पुलांवर विशेष काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

या व्यतिरिक्त, ५२० सुरक्षारक्षक समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात आले असून, तटरक्षक दलाची (कोस्टगार्ड) मदतही घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित प्रकारांना टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी वर्दीत आणि सामान्य कपड्यांतील महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून विसर्जनस्थळी तसेच मार्गांवर महिला सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

यावेळी पोलिसांनी दोन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे, ज्यामध्ये विसर्जित मूर्तीचे फोटो काढणे आणि सोशल मीडियावर प्रसारित करणे यावर बंदी आणि दुसरे निषिद्ध क्षेत्रांमध्ये ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईतील गणपती विसर्जनासाठी पोलिसांचे आवाहन:
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, बीएमसीचे स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जन स्थळी मदतीसाठी उपस्थित असतील. नागरिकांनी शिस्तीचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा