30.1 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरविशेषप्रीमियम सेवेमुळे बसने अगदी आरामात जा !

प्रीमियम सेवेमुळे बसने अगदी आरामात जा !

ही सेवा चार वातानुकूलित, शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बसेससह सुरू केली जात आहे.

Google News Follow

Related

मुंबई बनले आहे प्रीमियम सिटी बस सेवा असलेले भारतातील पहिले शहर. बेस्ट आपली प्रीमियम बस सेवा लवकरच सुरू करणार आहे. ही सेवा चार वातानुकूलित, शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बसेससह सुरू केली जात आहे. प्रवाश्यांना सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचे असे आश्वासन बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

ऑगस्टमध्ये याची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाचे अंतिम कागदपत्रे पूर्ण होण्यासाठी चार महिने लागले. या सेवेसाठी गर्दीच्या वेळेनुसार वेळापत्रक बनवण्यात आले आहे, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. पहिल्या टप्प्यात ही सेवा सोमवार ते शनिवार या दिवसांत उपलब्ध असणार आहे. बसेस महामार्गावर आणि सामान्य मार्गावर धावतील अशी माहिती समोर आली आहे. एक्स्प्रेस मार्ग ठाणे ते बीकेसी, सकाळी ७ ते ८:३० आणि संध्याकाळी बीकेसी ते ठाणे ५:३० ते ७ या वेळेत उपलब्ध असणार आहे . शिवाय, सामान्य मार्ग ज्यामध्ये बीकेसी ते वांद्रे स्टेशन मार्गावर सकाळी ८.५० ते संध्याकाळी ५:५० दरम्यान आणि वांद्रे स्थानकापासून बीकेसी पर्यंत सकाळी ९:२५ ते ६:२५ या वेळेत उपलब्ध होईल.

यानंतर आणखी वीस बसेस २५ डिसेंबरपर्यंत लोकांच्या सेवेत येती. त्यानंतर खारघर तो बीकेसी मार्गही उपलब्ध होईल. विशेष म्हणजे डिजिटल प्रणालीमुळे या बसेसमध्ये कोणतेही बस कंडक्टर नसतील. प्रवासी ‘टॅप-इन टॅप-आउट’ सुविधा वापरू शकतात. या बसेसची तिकिटे ‘चलो ॲप’ मधूनही बुक होतील. प्रवासी त्यांच्या मासिक प्रवासात ५० टक्के  पर्यंत बचत ‘ट्रॅव्हल सदस्यता’ या योजनेतून घेऊ शकतात.

हे ही वाचा :

पवारांचा गणपत वाणी झालाय का?

बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची झाडे तोडण्यास न्यायालयाचा हिरवा कंदिल

रेल्वेचा कुली; पण गरिबांचा शिक्षक

इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम

लोकेश चंद्रा, जनरल मॅनेजर म्हणाले की “ ही बस एका वेळी मोठ्या संख्येने लोकांची वाहतूक करू शकते आणि आपण खाजगी वाहनांचे प्रमाण कमी करू शकतो. लाईव्ह ट्रॅकिंग सुविधा पुढील बसचे वेळापत्रक शोधण्यात देखील मदत करेल,”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा