२२ जानेवारी रोजी प्रभू रामललांची प्राण प्रतिष्ठा होत आहे. या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज शासनाने सुट्टी जाहीर केल्याने तमाम राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शतकानू शतकांच्या संघर्षानंतर राम जन्मभूमी आयोध्येमध्ये प्रभू श्री राम मंदिराचे भव्य मंदिर साकारण्यात आले आहे. त्यात रामलला २२ जानेवारी रोजी विराजमान होत आहेत. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा, पवित्र आणि तितकाच ऐतिहासिक आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यांत सर्वांना सहभागी होता यावे, त्याचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली होती.
हे ही वाचा:
नोएडामध्ये एअर इंडिया कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या!
बिल्किस बानोप्रकरणी रविवारपर्यंत आत्मसमर्पण करा!
इस्रायलमध्ये बांधकाम विभागाकरिता भारतीय कामगारांची भरती मोहीम हरियाणात सुरु!
मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, पंतप्रधान झाले भावूक!
त्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच या दिवशी सर्वांनी दिवाळी साजरी करून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.