27 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरविशेषबॉलिवूड तारे -तारकांनाही पब्लिक हॉलिडे

बॉलिवूड तारे -तारकांनाही पब्लिक हॉलिडे

हिंदी सिनेमामध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक सुट्टीची घोषणा

Google News Follow

Related

सुट्ट्या घेणे कोणाला आवडत नाही. खाजगी क्षेत्राला नाही पण सार्वजनिक क्षेत्राला तर सार्वजनिक सुट्टीचाही आनंद घेता येतो. असे काही व्यवसाय आहेत जेथे सार्वजनिक सुट्ट्या असे काही नसते. आतापर्यंत या यादीत हिंदी चित्रपटांचाही समावेश होता. होय, सिनेमा हे एक जग आहे जिथे सुट्टीचा दिवस निश्चित नाही. चित्रपटाचे चित्रीकरण दररोज केले जाते. दररोज स्क्रिप्ट्स लिहिल्या जातात, चित्रपटांवर काम चालू असते. मात्र, आता आता बॉलीवूडसाठी आता आनंदाची बातमी आहे. हिंदी सिनेमामध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक सुट्टीची घोषणा झाली आहे.

हे ही वाचा:

आम्हाला आमची जमीन माहिती आहे, जे हवेत आहेत त्यांची तपासणी करायला हवी

हिजाब विरोधात निषेध करणाऱ्या दोन तरुणांना फाशी

वधूवर सूचक वेबसाइटवरून ओळख करून घेत त्याने १० लाखांना लुटले

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरी चोरी

आता हिंदी चित्रपटसृष्टीतही साजरी होणार सार्वजनिक सुटी. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने २०२३ वर्षासाठी सक्तीच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वर्षभरात एकूण १२सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

दर महिन्याला तारे-तारकांना सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाची (२६ जानेवारी) सुट्टी असेल. त्याचबरोबर १८फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी देण्यात येणार आहे. मार्च महिन्यात होळीची सुट्टी (८ मार्च) असेल.

अन्य सुट्ट्यांमध्ये १ मे रोजी कामगार दिनाची सुट्टी, २९जून रोजी ईदची सुट्टी आणि २९ जुलै रोजी मोहरमची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाची (१५ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आणि सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये दसरा, नोव्हेंबरमध्ये एक दिवस दिवाळीची सुट्टी आणि डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात ख्रिसमसची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,917चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा