30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामावधूवर सूचक वेबसाइटवरून ओळख करून घेत त्याने १० लाखांना लुटले

वधूवर सूचक वेबसाइटवरून ओळख करून घेत त्याने १० लाखांना लुटले

नोकरी आणि लग्नाचे आमिष

Google News Follow

Related

एका प्राध्यापकाला तुमच्या मुलीचे लग्न आणि नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून  दहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला शहर पोलिसांनी पकडले आहे. ७८ लाख रुपयांची एकूण माया जमा केलेल्या सचिन शिंदे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पंधरा महिन्यांच्या कालावधीत या आरोपीने क्रिकेटचा सट्टा खेळण्यासाठी आणि भव्य जीवनशैली जगण्यासाठी हे उद्योग केले असे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या खात्यांत दोन ते तीन लोकांनी नोकऱ्या मिळण्यासाठी त्याच्या खात्यात पैसे जमा केले होते.

मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी सचिन शिंदे याला पंधरा दिवसांपूर्वी अटक केली असता, दोन ते तीन लोकांनी नोकरी शोधण्याकरिता पैसे जमा केले. आम्ही अजूनही त्याच्या बँक खात्याचा अभ्यास करत आहोत असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. एपीआय विकास सुरवसे यांनी सांगितले की, त्याच्या आधीच्या पत्नीनेही त्याच्या खात्यात पैसे जमा केले आहेत, तिला चौकशीसाठी बोलावले असून तिने त्याच्या खात्यात पैसे का जमा केले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.

६५ वर्षीय महाविद्यालयांतील एका प्राध्यापकाला त्यांच्या ३६ वर्षीय मुलीशी लग्न करण्याचे आमीष शिंदेने दाखविले.तसेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे नोकरी आणि लग्नाचे आश्वासन देऊन पैसे घेतले. तक्रारदारांनी सांगितले की, तिने २०१९ ऑगस्टमध्ये लग्नाच्या वेबसाइटवर शिंदेंचे प्रोफाइल बघितले. शिंदेने सांगितले की तो हॉटेल व्यवसायांत आहे आणि वर्षाला दहा ते बारा लाख कमावतो. त्यांच्या मुलीने पत्राद्वारे त्याला संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की तो अंधेरीत राहतो. प्राध्यापकाने शिंदेला नोकरी लावू शकतो का विचारले आणि त्यांच्याकडून. ९.९ लाख रुपये उकळले. शिवाय मुलीशी लग्नही केलं नाही.

हे ही वाचा:

सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

आता आधार संजयबाबा बंगालींचा…

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी

 

शिंदे याचे अंधेरी येथे एक हॉटेल असून हॉस्पिटॅलिटी फर्म सुद्धा आहे. शिंदेंचे वडील एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये काम करत होते म्हणून तो तिथल्या काही लोकांना ओळखत होता. आपल्या हॉटेल मधून तो जेवण पण पाठवत असे. सुरवसे यांनी सांगितले, शिंदे हा सट्टा खेळत होता,हुक्का पित होता, तो आलिशान हॉटेल्स आणि गाड्यांमध्ये फिरायचा आणि तिथून विडिओ कॉल करायचा. हरलेल्या सट्टयाचे पैसे जमण्यासाठी तो लोकांना भुलवत होता  असे सुरवसे म्हणाले. ज्या लोकांनी पैसे दिले त्यांना फ़सलोय हे उशिरा कळले.

पोलीस सचिन शिंदेचा शोध घेत असताना त्याच्या मित्राची माहिती मिळाली, त्याला संपर्क साधला असता त्याचवेळेस शिंदेनी हॉटेलचे बिल भरण्यासाठी या मित्राला संपर्क करून क्यू आर कोड पाठवला. मित्राने त्याला पैसे पाठवले. पोलिसांनी त्यावरून आधी बँकेत संपर्क करून हॉटेलचे नाव आणि ठिकाण शोधून काढले. अशा प्रकरि शिंदेला अटक करण्यात आल्याचे सुरवसेंनी सांगितले. पुढील तपास चालू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा