शुक्रवारी (१७ जानेवारी) पुणे पोलिसांनी एका बांगलादेशी घुसखोराला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख एहसान हाफिज शेख (३४) अशी झाली असून तो २००४ पासून भारतात राहत होता. आरोपी एहसान शेख हा बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील रहिवासी आहे.
बांगलादेशी घुसखोर एहसान शेख सुमारे २० वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होता. कोलकाता येथील एजंटांच्या मदतीने त्याने बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून घेतले. भारतीय पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रे मिळविण्यासाठी त्याने या बनावट कागदपत्राचा वापर केला. बांगलादेशी घुसखोर २००९ मध्ये पुण्यात येण्यापूर्वी अहमदाबाद आणि मुंबईत राहत होता.
हे ही वाचा :
ठाण्यातील लेबर कँपला किरीट सोमय्यांची भेट, १२ पैकी ९ बांगलादेशी आढळले!
शेखर यादव यांच्या समान नागरी कायद्याबाबतच्या वक्तव्याविरोधात डावे एकवटले!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात भीषण आग!
आव्हाड भाऊ आरोपी मोहम्मद शहजाद आहे बरं!
आरोपी एहसान हाफिज शेख सुरुवातीला एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होता, परंतु नंतर त्याने स्वतःचा टी-शर्ट व्यवसाय सुरू केला. पोलिसांनी त्याच्याकडून ७ आधार कार्ड, २ मतदार ओळखपत्र, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ७ पॅन कार्ड, ४ पासपोर्ट, ९ क्रेडिट कार्ड, ९ डेबिट कार्ड, ८ जन्म प्रमाणपत्रे आणि ८ देशांचे चलन जप्त केले.
तसेच पोलिसांनी त्याच्याकडून घर करारनामा, व्यवसायाची कागदपत्रे आणि सिम कार्ड देखील जप्त केले आहे. एहसान हाफिज शेखवर आयपीसीच्या कलम ३१८, ३३६, ३३८ आणि ३४० तसेच पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
