31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरविशेषऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीचे रॅकेट उघडकीस!

ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीचे रॅकेट उघडकीस!

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई

Google News Follow

Related

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाइन शेअरिंग ट्रेडिंगच्या चार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी जुनैद, सलमान, अब्दुल, आरिफ आणि तौफिक यांना अटक करण्यात आली आहे.१० एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलिस सायबर सेलने हे रॅकेट उघडकीस आणले. यात बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन्स, मनी म्यूल अकाउंट्स (ज्यात कमिशनसाठी पैसे हस्तांतरित करण्याकरिता इतरांना त्यांची बँक खाती वापरण्यास दिली जातात) आणि यूएसडीटी क्रिप्टोकरन्सी हाँगकाँगला पैसे पाठवण्यासाठी याचा वापर केला जात होता.

या प्रकरणी गेल्या आठवड्यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुनैद मुख्तार कुरेशी (२१), सलमान मन्सूर शेख (२२), अब्दुल अजीज अन्सारी (२३), आरिफ अन्वर खान (२९) आणि तौफिक गफ्फार शेख (२२) अशी त्यांची नावे आहेत.ते दिवसा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते आणि १२० बँक खात्यांचे नेटवर्क बघत होते. या खात्यांचा वापर ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये बळी पडलेल्या लोकांकडून पैसे उकळण्यासाठी केला होता. एका ४६ वर्षीय महिलेच्या गुंतवणुकीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांना या गुन्हेगारांचा माग लागला. या महिलेची सायबर गुन्हेगारांनी ३५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. यामध्ये तिला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास तिला मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते.

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर मार्केट क्लासेस आणि गुंतवणूक याविषयीची पोस्ट पाहिली होती. यात एम्बेडेड लिंक होती. लिंक क्लिक केल्यावर तिचा नंबर ‘स्कोडर अकादमी व्हीआय’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडला गेला. त्यानंतर तिला एक डीमॅट खात्याचा अर्ज सादर करण्यास आणि आयपीओ खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये (मनी म्युल अकाउंट्स) पैसे हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले. महिलेने या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ३१ लाख ६० हजार रुपये आणि आणखी चार लाख रुपये धर्मादाय देणग्यांसाठी हस्तांतरित केले. नंतर, सायबरटोळीने तिच्याशी संपर्क तोडला.

सायबर सेल टीमने त्यांचा तपास टिंगरे नगर येथील जुनैद कुरेशीवर केंद्रित केला, जो पीडितेकडून पैसे घेतलेले खाते वापरत असल्याचे आढळून आले. त्याच्या चौकशीतून, लोहेगाव येथील सलमान शेख, अब्दुल अन्सारी आणि तौफिक शेख या तीन आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. हे आरोपी या प्रकारातील अनेक खाती चालवत होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढत होते.

हे ही वाचा:

मध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट

सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज

हे सर्व कोंढव्यातील आरिफ अन्वर खान या पाचव्या व्यक्तीला पैसे पुरवत होते, जो टेथर क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होता, ज्याला यूएसडीटी म्हणूनही ओळखले जाते, जे या रॅकेटच्या मास्टरमाईंडच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा करायचे होते. हे सर्वजण किमान १२० बँक खाती चालवत होते. ही खाती त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या नावावर आहेत. पिडीतांच्या बँक खात्यातून काढलेले पैसे मिळविण्यासाठी बँकखातीधारकांना त्यांच्या खात्यांसाठी अल्प रक्कम दिली जात होती.
गुन्हे शाखेचे डीसीपी संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने घोटाळेबाजांकडून एकूण ३१ लाख रुपये गमावल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या अंमलबजावणीद्वारे फसव्या शेअर ट्रेडिंग घोटाळ्याशी संबंधित पाच जणांचा माग काढण्यात आणि त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले.

गेल्या काही महिन्यांत, या १२० खात्यांमधून जवळपास १५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि कमीतकमी ७५ वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांमध्ये याचा वापर करण्यात आला आहे.हे सर्व आरोपी विविध कुरिअर आणि फूड डिलिव्हरी फर्म्समध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. तसेच, ते गरीब कुटुंबातील आहेत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही फारशी चांगली नाही. त्यांनी शिक्षणही अर्धवट सोडले असून ते डिलिव्हरी बॉय म्हणून तात्पुरती नोकरी करत होते. परदेशातून कार्यरत सायबर गुन्हेगारांसाठी ते कसे काम करत होते, याचा तपास आता पोलिस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा