28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारी सापडला अजगर; सर्पमित्रांनी वाचवले

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारी सापडला अजगर; सर्पमित्रांनी वाचवले

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्याशेजारी असलेल्या कलानगर जवळ मेकर मेक सिटी (जिओ वर्ल्ड वॉर) येथे अजगर सापडल्याने खळबळ उडाली. १३ जूनच्या मध्यरात्री १२:४५ला सर्प मित्र अतुल कांबळे यांना एक फोन आला आणि त्या ठिकाणी अजगर रस्ता ओलांडत असल्याचे सांगण्यात आले.

त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली. कलानगर ब्रिजखाली एक अजगर रस्ता ओलांडत असल्याचे त्यांना दिसले. त्याला वाचविण्यासाठी कांबळे यांना पाचारण करण्यात आले. त्याला वाचविले नाही तर तो एखाद्या गाडीखाली येईल, असेही त्यांना कळविण्यात आले.

हे ही वाचा:

‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’

अजित पवारांच्या भाषणावरून वाद

‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

 

सदर ठिकाणी अतुल कांबळे आणि त्यांचे सहकारी गेले असता हा अजगर एका पाईपमध्ये जाऊन बसला होता. त्यामुळे तो पुन्हा बाहेर पडून रस्त्यावर येण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच त्याला वाचवून सुरक्षित स्थळी नेणे गरजेचे होते. अजगर आढळला असल्याचे कळल्यानंतर सर्प मित्र अतुल कांबळे व त्यांचे सहकारी तसेच सर्प मित्र सूरज संतोष मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या अजगराला वाचविले. अजगराला जीवनदान मिळाले.

सदरचा अजगर हा शेड्युलमधील असल्याने त्याची माहिती वन-विभागाला देउन पोलिस डायरीत नोंद करून घेतली आहे. नंतर या अजगराला वन-विभागाच्या गाईड लाईननुसार त्याच्या र्नेसर्गीक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा