उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी जे प्रकारे वारंवार भारतीय सेनेवर आरोप करत आहेत, त्यातून असं वाटतंय की ते पाकिस्तानच्या प्रवक्त्याची भूमिका बजावत आहेत. शनिवारी दिलेल्या निवेदनात उपमुख्यमंत्री मौर्य म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पूर्णपणे बेलगाम झाले आहेत आणि त्यांचे वक्तव्य आता स्पष्टपणे राष्ट्रहिताच्या विरोधात जात असल्याचे दिसते.
राहुल गांधींची विधाने त्यांना एक जबाबदार खासदार ठरवत नाहीत, तर ते पाकिस्तानच्या प्रवक्त्याच्या भूमिकेत बसवतात. त्यांच्या बोलण्यात देशाच्या सार्वभौमत्वाची, सुरक्षेची आणि जनतेच्या भावनांची झलक दिसत नाही, उलट विदेशी शक्तींच्या ‘डिक्टेशन’ची झलक प्रकर्षाने दिसून येते. केशव मौर्य पुढे म्हणाले की, “जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करतो, तेव्हा राहुल गांधींची जुबान पाकिस्तानी होते. ते वारंवार आपल्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांचा अपमान करतात. जेव्हा भारत आतंकवादावर कठोर कारवाई करतो, तेव्हा राहुल गांधीसारखे नेते पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय लॉबीबद्दल अधिक काळजी करतात.”\
हेही वाचा..
पंजाबमध्ये शस्त्र तस्करी नेटवर्कवर मोठी कारवाई
एनआयएने गोल्डी बरारसह ५ जणांविरुद्ध केले आरोपपत्र दाखल
त्यांनी असेही म्हटले की, काँग्रेस नेते आता राष्ट्रवादाला क्षुल्लक मानू लागले आहेत आणि केवळ मतपेढीच्या गणितावरच लक्ष केंद्रीत करत आहेत. राहुल गांधींचे वर्तन संसदीय मूल्यांचे उल्लंघन करणारे असून, देशाच्या सुरक्षा धोरणाला कमकुवत करणारे आहे. देशातील जनतेला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की, विरोधी पक्षनेते कोणाच्या इशाऱ्यावर भारताच्या विरोधात उभे राहतात.
“मोदी सरकार आणि देशातील जनता सेनेच्या पाठीशी उभी आहे, राष्ट्रवादाच्या पाठीशी उभी आहे आणि अशा बेलगाम वक्त्यांना लोकशाहीची मर्यादा व देशभक्ती यांचा धडा शिकवणे ही काळाची गरज आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ हँडलवरूनही राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले – “राहुल गांधी कपाळावर संविधान ठेवून संपूर्ण जगात ‘छुट्टा’ फिरत आहेत आणि त्याचबरोबर संवैधानिक संस्थांवर सातत्याने हल्ले करण्याचा ‘दुस्साहस’ देखील करत आहेत. त्यांच्यासाठी संविधान एक केवळ पुस्तक आहे, किंवा त्यांचा संविधानप्रेम हा एक ‘मुखवटा’ आहे.”
